Jalgaon Accident Case : ‘त्या’ अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा; दोघांचा मृत्यू

Jalgaon Accident : सुसाट कार लिंबाच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात आनंद सोनवणे जागीच ठार झाला होता.
Accidental car
Accidental caresakal
Updated on

Jalgaon Accident Case : शिरसोली रोडवरील हॉटेलमधून जेवण करून घराकडे परतत असताना, सुसाट कार लिंबाच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात आनंद सोनवणे जागीच ठार झाला होता. जखमी योगेश रेंभोटकर यांचा बुधवारी (ता. १७) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ()

कासमवाडी भागातील आनंदा शांताराम सोनवणे (वय ३९), योगेश भालचंद्र रेंभोटकर आणि भैरव ऊर्फ मुन्ना भगवान सोनवणे, पप्पू आढाव रविवारी (ता. १४) शिरसोलीजवळील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर ते कार (एमएच १९, सीझेड १२१२)ने शहराकडे परतत असताना, मोहाडी रोडवर सुसाट कार अनियंत्रीत झाल्याने कार थेट कडूलिंबाच्या झाडावर आदळली होती. याबाबत नीलेश राजेंद्र सोनवणे (वय २८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक भैरव ऊर्फ मुन्ना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक संजयसिंग पाटील तपास करीत आहेत.

Accidental car
Jalgaon Crime News : फैजपूरला चोरीच्या गुन्ह्यात दोघांना अटक; जिल्ह्यात 7 ठिकाणी चोऱ्या केल्याचे उघड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com