Jalgaon Crime News : रेल्वे ‘आरपीएफ’वर हल्ला; 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon Crime : रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक पाचवर मद्रास बेकरीच्या नवीन स्टॉलचे उद्घाटन झाले. या नवीन स्टॉलच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये आपसात वाद सुरू झाला.
Crime
Crime esakal
Updated on

भुसावळ : येथील रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक पाचवर मद्रास बेकरीच्या नवीन स्टॉलचे उद्घाटन झाले. या नवीन स्टॉलच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये आपसात वाद सुरू झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या वेळी रेल्वे आरपीएफ कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने रेल्वे लोहमार्ग ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अकरा जणांना अटक करण्यात आली आहे.(Jalgaon crime Attack on Railway RPF)

रेल्वे सुरक्षा बल विभागाचे पोलिस निरीक्षक राधा किशन मीना, ए. ओ. गोपाल, लाल मीना हे मंगळवारी (ता. २) कर्तव्यावर मुख्य पार्सल कार्यालय, भुसावळ येथे हजर असताना साडेबाराच्या दरम्यान सहाय्यक फौजदार दीपक तायडे यांनी फोनद्वारे कळविले, की फलाट क्रमांक पाचच्या जळगाव बाजूकडे मद्रास बेकरीच्या नवीन स्टॉलचे उद्घाटन झाले असून.

त्या ठिकाणी उद्घाटनासाठी आलेले लोक व फलाट क्रमांक सहावरील एम. आर. इंटरप्रिटेशनचे वेंडर आणि इतर बाहेरील लोक असे एकूण सुमारे १५० जण जमा झाले व मद्रास बेकरीच्या नवीन स्टॉलच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये आपसात वाद सुरू झाला. आरपीएफ निरीक्षक मीना यांनी या घटनेबाबत लोहमार्ग ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांना माहिती दिली व तत्काळ पथकास पाठविण्यास सांगितले.

Crime
Crime News: अभिनेत्रीचा लैंगिक छळ; चित्रपट दिग्दर्शकाला अटक

घटनास्थळी पथक पोहचले असता एम. आर. इंटरप्राइजेसचे सुपरवायझर अफसर रफिक मेमन, रियाज अब्दुल मोहम्मद रेहमान, शेख कलिमोद्दीन शेख अलिमोद्दीन, शेख नदीम नथ्थू बागवान तसेच मद्रास बेकरीचे सय्यद हमीद सय्यद कासीम, रईस सद्दाम बागवान (रईस पहिलवान), सय्यद कासीम सय्यद हमीद, शेख इरफान शेख चाँद तथा दोन्ही गटांचे सुमारे १५० जणांना आरपीएफ व जीआरपी यांनी वाद सोडवून शांत केले व मुख्य व्यक्तींना आरपीएफ पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

या घटनेतील फिर्यादी व त्यांचे सहकारी फलाटावरील बेकायदेशीर जमाव नियंत्रण करीत असताना फलाट क्रमांक पाच व सहावरील पुलाजवळ बेकायदेशीर जमावातील सद्दाम शेख बशीर, आझाद शेख बशीर, शेख सलमान शेख बशीर, मुझफ्फर सय्यद लियाकत अली, शेख समीर शेख हमीद.

वसीम खान बिस्मिल्ला खान व इतर संशयितांनी मिळून फिर्यादी व त्यांचे सहकारी आरपीएफ कर्मचारी महेंद्र कुशवाह यांच्यावर अचानक हल्ला केला व फिर्यादीला धक्काबुक्की करून कॉलर पकडून हाताने व लाथाने मारहाण करून चेहऱ्यावर गंभीर जखमी केले. या प्रकरणी रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अकरा संशयितांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब मगरे करीत आहेत.

Crime
Pune Crime News : ‘हवेत उडणारे’ चोरटे अखेर जमिनीवर ; विमानाने पुण्यात येऊन चोरी करणारी राजस्थानमधील टोळी गजाआड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.