Jalgaon Crime News : बनावट दस्तावेज प्रकरणी टपाल कर्मचाऱ्यावर गुन्हा

Jalgaon Crime : तालुक्यातील मारवड येथील टपाल कर्मचारी चेतन शांताराम ठाकूर यांनी बनावट नकाशे दस्तऐवज प्रांताधिकारी न्यायालयात दाखल केले.
Fake Document
Fake Documentesakal
Updated on

Jalgaon Crime News : तालुक्यातील मारवड येथील टपाल कर्मचारी चेतन शांताराम ठाकूर यांनी बनावट नकाशे दस्तऐवज प्रांताधिकारी न्यायालयात दाखल केले. कृषी अधिकारी यांना चुकीची माहिती देऊन खोटा अहवाल तयार केल्याप्रकरणी येथील शिक्षक आत्माराम चौधरी यांनी काल याबाबत फिर्याद दिली. त्यावरून अमळनेर पोलिस ठाण्यात ठाकूरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Case against postal employee in case of fake document )

चौधरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, २०११पासून चेतन ठाकूर यांची वडील शांताराम ठाकूर यांच्याविरुद्ध तहसीलदार यांच्याकडे बांध फोड केस सुरू होती. तेथील निकालानंतर सध्यास्थितीत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रिव्हिजनची प्रक्रिया न्यायप्रविष्ठ आहे.

ठाकूर यांनी सदरील रिव्हीजनच्या कामकाजाबाबत नकाशाची प्रत पुरविताना मूळ नकाशावर असलेली अमळनेर मंडळ कृषी अधिकारी यांची स्वाक्षरी व शिक्का बेमालूमपणे लपवून नवीन नकाशा केवळ मंडळ कृषी अधिकारी यांची सही व शिक्का वगळून झेरॉक्स काढून ती प्रत मंडळ कृषी अधिकारी मारवड अविनाश खैरनार यांना पुरविली होती.

Fake Document
Jalgaon Crime: जुन्नी टोळीच्या मदतीने सराफा पेढ्या फोडण्याचा धडाका! एक लाखांची चांदी जप्त; रितेशने आखली गुन्ह्यांची ब्लुप्रिंट

ठाकूर याचा हेतू सदरील नकाशा हा चुकीचा व अवैध आहे, असे उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टापुढे ठरावे व कोर्टात नकाशाबद्दल जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा ठाकूर याचा प्रयत्न होता. शिवाय ठाकूर याने उपविभागीय अधिकारी यांच्याकडील रिव्हीजनच्या कामकाजात महाराष्ट्र सुदुर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर यांच्याकडील अमळनेर येथील कॅडास्ट्रल मॅप २० फेब्रुवारी २०२४ रोजी लेखी युक्तीवादासोबत दाखल केला होता.

युक्तीवादात सदरील मॅप पुरावा म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र नागपूर यांनी दिलेली सही शिक्याची रंगीत सत्यप्रतवर स्पष्टपणे नमूद केले आहे की, सदर नकाशा हा कोणत्याही कोर्टात पुरावा म्हणून देऊ नये. तरीही ठाकूरने येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टात सदर नकाशा हा डिसक्लेमरवगळून दाखल केला आहे.

तो दस्त कोर्टात पुरावा म्हणून खरा आहे, असा भासवण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील दस्त उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टात दाखल केल्याने त्यांच्या न्यायालयात दाखल असलेल्या रिव्हीजन निकालावर परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याने येथील पोलिस ठाण्यात ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अजित सावळे तपास करीत आहेत.

Fake Document
Jalgaon Crime News : गुजरातला पळून जाताना साक्रीहून 6 संशयित ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.