Jalgaon Crime News : नेपाळी नोकराचा साथीदारांच्या मदतीने सिनेस्टाईल दरोडा; व्यावसायिक राजा मयूर यांच्या घरी चोरी

Jalgaon Crime : गुंगीचे औषध टाकलेले सरबत पाजून, राजा महावीर यांच्या पत्नी शैला मयूर यांना धमकी देत दरोडा टाकल्याची घटना शुक्रवारी (ता. ३१) रात्री दोनच्या सुमारास घडली.
Household belongings disturbed by robbers.
Household belongings disturbed by robbers.esakal
Updated on

Jalgaon Crime News : शहरातील दूध फेडरेशनशेजारी वास्तव्यास असलेले उद्योजक कंत्राटदार, तसेच जळगाव घरकुल प्रकरणातील प्रमुख संशयित राजा मयूर यांच्यासह दोन सुरक्षारक्षकांना गुंगीचे औषध टाकलेले सरबत पाजून, राजा महावीर यांच्या पत्नी शैला मयूर यांना धमकी देत दरोडा टाकल्याची घटना शुक्रवारी (ता. ३१) रात्री दोनच्या सुमारास घडली. मयूर यांच्याकडे कामाला असलेल्या नेपाळी नोकराने त्याच्या चार साथीदारांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याची माहिती समोर येत आहे. (Cinestyle robbery of Nepali servant with help of accomplices )

दूध फेडरेशन परिसरात राजा ट्रॅक्टरचे मालक राजेंद्र अनिल मयूर ऊर्फ राजा मयूर (वय ८४) पत्नीसह वास्तव्याला आहे. त्यांच्या बंगल्यावर विकास नेपाळी नावाचा नोकर काही वर्षांपासून कामाला होता. राजा मयूर यांच्या घराच्या बाजूलाच क्वार्टरमध्ये तो राहत होता.

सुरक्षारक्षकांना सरबतातून गुंगीचे औषध

बंगल्यात दोन सुरक्षारक्षक रात्रीला पहारा देतात. गुरुवारी (ता. ३०) रात्री साडेदहाला विकास नेपाळी याने भावाला मुलगा झाला म्हणून सुरक्षारक्षक वसंत श्रीखंडे, उदय समेळ यांना सरबत पाजले. सरबतमध्ये त्याने गुंगीचे औषध टाकले होते. त्यांनी हे सरबत राजा मयूर यांनाही पाजले. त्यामुळे दोन्ही सुरक्षारक्षक आणि राजा मयूर बेशुद्ध झाले.

त्यानंतर शुक्रवारी (ता. ३१) रात्री दोनला विकास नेपाळी याने त्याचे साथीदार असलेले चार जणांना बोलावून घेतले. त्यावेळी घरात राजा मयूर यांची पत्नी शैला मयूर यांना बाथरूममध्ये बंद करून त्यांना धमकी दिली. संशयित विकास नेपाळी व त्याचे इतर चार साथीदारांनी मिळून घरातील मुख्य खोली उघडून घरातील सामान अस्तव्यस्त करून घरातील मौल्यवान वस्तू व सोन्याचे दागिने चोरून नेले.

Household belongings disturbed by robbers.
Jalgaon Crime News : भुसावळला गोळीबार! 2 ठार; घटनेचे कारण अस्पष्ट

फोन न उचलल्याने घटना उघडकीस

शुक्रवारी सकाळी सातला राजा मयूर जैन हिल्स येथे मॉर्निंग वॉकिंगसाठी जातात. त्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांचा चालक कांतिलाल टाक यांनी राजा मयूर यांना फोन लावला. परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे चालकाने त्यांचे भाऊ भरत मयूर यांना फोन करून ते फोन उचलत नसल्याचे सांगितले. त्यानुसार भारत मयूर राजा मयूर यांच्या घरी आले असता, हा सर्व प्रकार उघडकीला आला. बेशुद्ध सुरक्षारक्षक आणि राजा मयूर यांना उठवून पाणी पाजले. त्यानंतर भिजलेल्या अवस्थेत असलेल्या शैला मयूर यांनाही धीर दिला.

पोलिसांनी घेतली धाव

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस कर्मचारी, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित व पथक घटनास्थळी दाखल झाले. शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चौकशीला सुरवात केली.

मयूर दांपत्य इस्पितळात दाखल

या घटनेत दरोडेखोऱ्यांनी राजा मयूर यांच्या पत्नीस धमकावून बांधून ठेवले. तर राजा मयूर यांनाही धक्काबुक्की केली. या धक्क्यातून दोघा ज्येष्ठांची प्रकृती खालावली असून, त्यांना खासगी इस्पितळात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, ते पोलिसांना जबाब देण्याच्या स्थितीत नाहीत. शिवाय घरातून नेमका किती ऐवज गेला, हेही अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Household belongings disturbed by robbers.
Jalgaon Crime News : न्यायालयात संशयितांना ‘व्हीसी’द्वारे हजर; भुसावळ गोळीबार प्रकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.