Jalgaon Crime News : कापूस चोरी पचवून टाकला दरोडा; दरोडेखोरांची कबुली

Jalgaon Crime : सात ते आठ दरोडेखोरांनी एका घरात दरोडा टाकून घरातील रोकड व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे १७ लाखांचा ऐवज लुटून नेला होता.
Crime
Crimeesakal
Updated on

Jalgaon Crime News : दहिवद (ता. चाळीसगाव) गावात १२ मेस पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी एका घरात दरोडा टाकून घरातील रोकड व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे १७ लाखांचा ऐवज लुटून नेला होता. या गुन्ह्यातील चौघा संशयितांना येथील पोलिसांनी पकडले आहे. त्यांची कसून चौकशी केली असता, दहिवद गावात दरोडा टाकण्यापूर्वी त्यांनी याच शिवारातूनच सुमारे २० क्विंटल कापूस चोरला होता. कापूस चोरीच्या या गुन्ह्याचा पोलिसांना शोध लावता न आल्याने दरोड्याचाही पोलिस तपास करू शकणार नाही, असे त्यांना वाटल्याने त्यांनी गावात दरोडा टाकला. (Confession of robbery of Robber after cotton theft)

मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना जेरबंद केले. याबाबत माहिती अशी, दहिवद (ता. चाळीसगाव) येथील धर्मराज रामा वाघ यांच्या बंगल्यावर १२ मे रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. घरातील सदस्यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करुन सुमारे १६ लाख १५ हजारांचा ऐवज लूटून नेला होता. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसांनी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांना चौकशी दरम्यान हा दरोडा मध्यप्रदेशातील भामपूर या अतिदुर्गम भागातील गुन्हेगारांनी टाकल्याचे उघड झाले होते. त्यानुसार, पोलिसांनी एका विधीसंघर्ष बालकासह तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दरोड्यातील लूट केलेल्या रकमेसह गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पीकअप वाहन असा सुमारे १६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या प्रकरणी संशयित विक्रम वासने, शांतीलाल बारेला, सुनील बारेला, रिमसिंग बारेला अशांना अटक केली होती.

कापूस चोरीचीही कबुली

अटकेत असताना येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांनी त्यांचा इतरही काही गुन्ह्यात सहभाग आहे का, म्हणून चौकशी केली असता, दहिवद शिवारातच चार महिन्यापूर्वी नवल पवार यांच्या शेतातील गोडावूनमधील त्यांनी सुमारे २० क्विंटल कापूस चोरीची कबुली दिली. चोरी केलेला हा कापूस त्यांनी सेंधवा येथील कापूस व्यापाऱ्याला विकला होता. कापूस चोरी करुन विकल्यानंतरही आपला कोणालाच काही संशय आला नाही असे वाटल्याने त्यांनी दरोडा टाकून मोठी लूट करण्याचे ठरवले.

Crime
Jalgaon Crime News: भुसावळच्या दुहेरी खुनातील सहाव्या संशयिताला अटक; बाजारपेठ पोलिसांनी वरणगावातून घेतले ताब्यात

मात्र, पोलिसांनी मोठ्‍या शिताफीने तपास करुन त्यांना पकडले. दरम्यान, या दरोडेखोरांनी सेंधवा (मध्यप्रदेश) येथे विकलेला कापूसही पोलिसांनी जप्त केला आहे. ही कार्यवाही सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, हवालदार देविदास पाटील, गोकूळ पाटील, गोरख चकोर, नीलेश लोहार, भूषण बाविस्कर, ईश्‍वर देशमुख आदी कर्मचाऱ्यांनी केली.

जामनेर दरोड्यातही शक्यता

दहिवद दरोडा व कापूस चोरी प्रकरणात मेहुणबारे पोलिसांनी अटक केलेल्या चौघांपैकी विक्रम वासने हा या सर्व दरोडेखोरांचा म्होरक्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जामनेर तालुक्यातही दरोड्याची घटना घडून सुमारे १८ लाखांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार घडला होता. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी विक्रम वासने याला जामनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य तिघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान, मेहुणबारे पोलिसांनी लावलेल्या या दरोड्याच्या तपासाबद्दल परिसरातील ग्रामस्थांमधून पोलिसांचे कौतुक होत असले तरी या भागातील गिरणा नदीपात्रातून सर्रास होणाऱ्या वाळू चोरीला अद्यापही पाहिजे तसा लगाम बसलेला नाही. पोलिसांनी वाळू चोरी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

''दरोडेखोरांनी दहिवद येथील कापूस चोरीच्या घटनेची कबुली दिली. त्यांच्याकडून अशा प्रकारचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. परिसरात अनोळखी व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना अढळल्यास पोलिसांना तातडीने कळवावे.''- संदीप परदेशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे

Crime
Jalgaon Crime News : अजय कॉलनीतील घरफोडीत दीड लाखाचा ऐवज लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.