Jalgaon Crime News : अभियंता पाटलांच्या नावाने कंत्राटदारास दिली धमकी! शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Crime News : येथील बांधकाम व्यावसायिक व कंत्राटदार अजय बढे यांना शेततळ्याचे काम मिळवून देतो, असे सांगत त्यांची ४५ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी बढे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

Jalgaon Crime News : शेततळ्याच्या कामाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची ४५ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्याचा राग आल्याने अभियंता व्ही. डी. पाटील यांच्या नावाने कंत्राटदारास धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. (crime contractor threatened in name of Engineer Patil)

Crime News
Crime News : पतीच्या प्रेयसीविरोधात हिंसाचाराची तक्रार फेटाळली

येथील बांधकाम व्यावसायिक व कंत्राटदार अजय बढे यांना शेततळ्याचे काम मिळवून देतो, असे सांगत त्यांची ४५ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी बढे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. चौकशी होऊनही गुन्हा दाखल होत नव्हता, म्हणून श्री. बढे यांनी न्यायालयात दाद मागितली. त्यावर न्यायालयाने नुकताच निर्णय देत या प्रकरणात माजी माहिती अधिकारी तथा निवृत्त अभियंता व्ही. डी. पाटील यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.

बढे यांनी न्यायालयात जाऊन आदेश आणल्याचा राग आल्याने या प्रकरणातील दुसरे संशयित पंकज नेमाडे यांनी अजय बढे यांना मोबाईलवर ‘अज्जूशेठ तू व्ही. डी. पाटील साहेबांना चांगल्या प्रकारे ओळखतो. तू जे केलंय त्याचे गंभीर परिणाम तुला भोगावे लागतील.’ असा मेसेज बढे यांना पाठविला आहे. त्यामुळे बढे यांनी याबाबत शहर पोलिसांत तक्रार दिली.

Crime News
Nashik Crime News : ACB च्या नावाखाली अज्ञातांकडून लुट! चांडक सर्कल येथील मध्यरात्रीचा प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.