Jalgaon Crime News : गोरक्षकांनी वाचविले गायींचे प्राण! 2 गायींसह वासराची सुटका; मेहुणबारे पोलिसांची कारवाई

Jalgaon Crime : छोटा हत्ती मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त जनावरांना निर्दयीपणे कोंबून त्यांची वाहतूक करण्याचा प्रयत्न गोरक्षकांनी हाणून पाडला.
Crime
Crime esakal
Updated on

Jalgaon Crime News : छोटा हत्ती मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त जनावरांना निर्दयीपणे कोंबून त्यांची वाहतूक करण्याचा प्रयत्न गोरक्षकांनी हाणून पाडला. येथील पोलिसांच्या सहकार्याने केलेल्या या कारवाईत दोन गायी व वासराचे प्राण वाचले. या प्रकरणी एका संशयिताविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोंढे (ता. चाळीसगाव) गावातून छोटा हत्ती मालवाहू वाहनातून (क्रमांंक- एम. एच. १९ बीएम ०८९३) गायी व वासरांना टाकून हे वाहन वेगाने जात असल्याची माहिती येथील गोरक्षकांना मिळाली. ( Cow guards saved lives of Calf release with 2 cows)

त्यानुसार, येथील भरत वाघ, विकी शितोळे व विरेंद्र राजपूत यांनी हे वाहन मेहुणबारे येथे थांबवले. वाहनधारकाकडे जनावरे खरेदी विक्रीचा कुठलाही परवाना आढळून आला नाही. निर्दयीपणे क्षमतेपेक्षा जास्त गुरे वाहनात कोंबून घेऊन जात असल्याने मेहुणबारे पोलिसांना याबाबत कळवले.

पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन गायी व वासरासह वाहन ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी भरत वाघ यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक इमरान खान रऊफखान (रा. भोरस, ता. चाळीसगाव) याच्या विरोेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक जालमसिंग पाटील करीत आहेत. (latest marathi news)

Crime
Jalgaon Crime News : महाविद्यालयातील चोरीप्रकरणी 5 संशयित जेरबंद; चौघांना पोलिस कोठडी

तेरा म्हशींसह वाहन जप्त

ही कारवाई करण्यापूर्वी येथील पोलिसांनी वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक म्हशी निर्दयीपणे कोंबून त्यांची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई केली. यात वाहनातील १३ म्हशींची सुटका करण्यात आली. लळिंग (ता. धुळे) येथील दुग्ध व्यावसायिक किसन झिपरे यांना चाळीसगाव बायपासवर टाटा आयशर गाडी मालेगाव रस्त्याने जाताना दिसली. श्री. झिपरे यांनी त्या वाहनाचा पाठलाग करून साकूर फाटा येथे वाहन थांबवून मेहुणबारे पोलिसांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आयशरची (क्रमांक- एम. एच. ४३ ई ५६३०) तपासणी केली असता, त्यात लहान मोठ्या अशा १३ म्हशी अत्यंत निर्दयीपणे कोंबल्याचे दिसून आले. वाहनचालकाकडे गुरे खरेदी- विक्रीचा कुठलाही परवाना नव्हता. पोलिसांनी १३ म्हशी आणि वाहन असा सुमारे चार लाख ४२ हजारांचा ऐवज जप्त केला.

याबाबत किसन झिपरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात चालक आबिदखान अकमलखान कुरेशी (रा. चाळीसगाव) व क्लिनर आसिफखान आयुबखान (रा. मालेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार मिलिंद शिंदे तपास करीत आहेत.

Crime
Jalgaon Crime : चोरट्यांकडून एकापाठोपाठ 4 घरफोड्या! विकसित नव्या वस्त्या टार्गेटवर; लाखोंच्या ऐवजासह रोकड लंपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.