जळगाव : वेगवेगळे आमिष दाखवीत ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत असून, त्याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विमा कंपन्यांचे नाव करीत त्यांच्यामार्फत बोनस दिला जात असण्यासह शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत फसवणूक केली जात आहे. त्यामुळे अशा फसव्या लिंकला बळी पडल्यास आपले बँक खाते साफ होऊ शकते. ऑनलाइन फसवणुकीचे वेगवेगळे ६५ गुन्हे जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात दाखल झाले आहेत. तर, पाचशेपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या फसवणुकीच्या दिवसाला किमान पाच तक्रारी समोर येत आहे. (Diwali blast of cyber criminals Amount more than 5 lakhs required for complaint )