Jalgaon Crime News : वीज तारांची चोरी करणारे ताब्यात; पारोळा पोलिसांकडून तिघा संशयितांना अटक

Latest Crime News : येथील पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टोळीतील तिघांना रविवारी (ता. १५) रंगेहात पकडून गजाआड केले.
Police Inspector Sunil Pawar, Sub-Inspector Raju Jadhav and staff with the suspected accused.
Police Inspector Sunil Pawar, Sub-Inspector Raju Jadhav and staff with the suspected accused.esakal
Updated on

पारोळा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेच्या खांब्यांवरील इलेक्ट्रिक तारांची चोरी करणारी टोळी सक्रीय झाली होती. येथील पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टोळीतील तिघांना रविवारी (ता. १५) रंगेहात पकडून गजाआड केले. (Electricity wire thieves arrested)

पोलिस निरीक्षक सुनील पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सांगवी (ता. पारोळा) शिवारात वीज कंपनीच्या अल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी संशयितरित्या फिरत होती. त्यानुसार त्यांनी पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार सुनील हाटकर, प्रवीण पाटील, आशिष गायकवाड, योगेश शिंदे, अनिल वाघ यांना पाठवले.

सांगवी परिसरात पोलिसांचे पथक गेले असता, साधारणतः रात्री नऊच्या सुमारास समाधान पाटील (रा. एरंडोल) हा आपल्या चार चाकी काली पिली वाहनासह (क्रमांक- एम. एच. १९ वाय ११९२) मिळून आला. त्याची चौकशी केली असता, सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. (latest marathi news)

Police Inspector Sunil Pawar, Sub-Inspector Raju Jadhav and staff with the suspected accused.
Nashik Crime News : म्हसरूळला 3 हजार किलो चंदनाचे लाकूड जप्त! मुख्य वनसंरक्षकांच्या बंगल्यातील झाड मात्र गायबच

त्याला पोलिस ठाण्यात आणले असता, त्याच्याजवळ तारा कापण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. त्याच्यासोबत असलेले रवींद्र अनिल मिस्तरी (रा. साईनगर, एरंडोल) व धनराज प्रकाश ठाकूर (रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) हे दोघे फरार झाले होते. मात्र, येथील पोलिसांनी त्यांचा शिताफीने शोध घेऊन त्यांना रात्री अडीचच्या सुमारास ताब्यात घेतले.

त्यांच्या जवळही इलेक्ट्रिक तार कटिंग करण्याची साहित्य, एक काली पिली व एक दुचाकी मिळून आली. या तिघांनी पारोळा व एरंडोल तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रिकल अल्युमिनियमच्या तारा चोरी केल्याचे कबुली दिली. तिघा संशयितांकडून इलेक्ट्रिक तारांच्या चोरीचे आणखीन काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता असल्याने पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

Police Inspector Sunil Pawar, Sub-Inspector Raju Jadhav and staff with the suspected accused.
Nashik Crime News : ट्रॅक्टरचे आमिष दाखवून कोल्हेरच्या शेतकऱ्याला गंडा! तोतया संदीप अवधूतविरोधात वणी पोलिसांत गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.