Counterfeit Currency: बनावट नोटा विक्रीसाठी आलेला पोलिसांच्या जाळ्यात; साडेअठ्ठेचाळीस हजारांच्या 500 रुपयांच्या नोटा जप्त

Counterfeit Currency : शहरातील आर. आर. विद्यालयामागील गल्लीत जिल्‍हापेठ पोलिसांनी बनावट नोटांसह यावलच्या बुलेटस्वार तरुणाला अटक केली.
Fake Currency
Fake Currencyesakal
Updated on

जळगाव : शहरातील आर. आर. विद्यालयामागील गल्लीत जिल्‍हापेठ पोलिसांनी बनावट नोटांसह यावलच्या बुलेटस्वार तरुणाला अटक केली. त्याच्याकडे बनावट ५०० रुपयांच्या ४७ नोटा (४८ हजार ५००) मिळून आल्या. चेतन शांताराम सावकारे (वय २७, रा, पुण्यनगर, यावल) असे संशयिताचे नाव आहे. जळगाव शहरातील आर. आर. विद्यालयामागील निर्मनुष्य गल्लीत तरुण ५०० रुपयांच्या बनावट नोटा विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेश माणगावकर यांच्या पथकाला मिळाली. (Fake notes for sale in city arrested on youth by police )

त्यावरून गुन्हेशोध पथकातील मिलिंद सोनवणे, सुभान तडवी, जयेश मोरे, विशाल साळुंखे, तुषार पाटील, अमितकुमार मराठे व पंच आर. आर. विद्यालय परिसरात पोहोचले. बुलेट (एमएचसीएल २२२१)वरून एक तरुण येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. चौकशी करताना तरुण गडबडला आणि बुलेट सोडून पळण्याच्या प्रयत्नात असताना, झडप घालून पोलिसांनी त्याला पकडले.

त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्या खिशातून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल मिळून आले. चौकशी केली असता, चेतन शांताराम सावकारे असे त्याने नाव सांगितले. त्याला अटक करून पोलिस ठाण्यात आणले. नोटांची तज्ज्ञांकडून तपासणी केल्यावर, त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलिस नाईक मिलिंद सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Fake Currency
Dhule Fake Currency : बनावट खत कारखाना उद्‍ध्वस्त! करवंद येथे 23 लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर गुन्हा

विक्रीसाठी आल्याचा संशय

जळगाव जिल्ह्याचे प्रमुख शहर असून, मध्य प्रदेशचा सीमावर्ती भाग, भुसावळ व मुक्ताईनगर या तालुक्यांतून बनावट नोटा शहरात विक्रीसाठी आणल्या जात असल्याचा संशय पोलिसांना आहे.

मतदारांनो, सावधान

विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहत असताना, मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी नकली नोटांचा वापर होऊ शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. बाजारभावानुसार पाचशे रुपयांपासून ते शंभर रुपयांच्या बनावट नोटा निम्म्या दराने दलालांमार्फत विक्रीसाठी आणल्या जातात. खऱ्या नोटांमध्ये या नोटा मिसळून त्या दिल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अटकेतील संशयितांकडून बनावट नोटा छापणाऱ्या व विक्री करणाऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Fake Currency
Counterfeit Currency : बनावट चलनाचा वापर म्हणजे दहशतवाद; कायदेशीर व्याख्येत सुधारणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.