Jalgaon Crime News : तोतया अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या! वनरक्षक म्हणून नोकरी लावण्याचे दाखवले आमिष

Latest Crime News : पोलिस मित्राने खात्री करून कळवतो असे सांगून तपास केला असता, नितीन पगारे हा तोतया अधिकारी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तुझी फसवणूक झाली असून तू तत्काळ पोलिसांना कळव असे सांगितले.
Criminal arrested
Criminal arrestedesakal
Updated on

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : वन विभागात अधिकारी असून वनरक्षक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणाची एक लाख रूपयात फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांत तोतया अधिकाऱ्यासह त्याच्या मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (fake officer arrested)

चाळीसगाव येथील चौधरीवाडा भागातील निखिल पगारे या तरुणाची नामदेव वाघ या रूग्णवाहिका चालकाशी ओळख झाली होती. त्याने त्याच्या ओळखीचा नितीन पगारे हा वन विभागात वनपरिक्षेत्र अधिकारी असल्याचे सांगून तो वन विभागात वनरक्षक म्हणून नोकरी लावून देतो असे सांगितले होते.

त्यानुसार, निखील पगारे याने नितीन पगारेची भेट घेतली असता, त्याने वनरक्षक म्हणून नोकरी लावण्यासाठी पाच लाख रूपयांची मागणी केली व उद्यापर्यंत दोन लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानुसार, निखील पगारे याने या नितीन पगारे व नामदेव वाघ या दोघांना मंगळवारी (ता. १७) धुळे रोडवरील दसेगाव शिवारातील एका हॉटेलजवळ एक लाख रूपये दिले.

त्यावर काम होऊन जाईल, उद्यापर्यंत आणखीन एक लाख रूपये द्या, असे सांगितले. निखिल पगारे याने ही विषय पोलिस दलात कार्यरत असलेल्या आपल्या मित्राला सांगितला. पोलिस मित्राने खात्री करून कळवतो असे सांगून तपास केला असता, नितीन पगारे हा तोतया अधिकारी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तुझी फसवणूक झाली असून तू तत्काळ पोलिसांना कळव असे सांगितले. (latest marathi news)

Criminal arrested
Ratnagiri Crime News : स्वप्नामुळे झाला मृत्यूचा उलगडा? जीवन संपवले की घातपात? भोस्ते घाटातील प्रकार

त्यानंतर बुधवारी (ता. १८) सायंकाळी पाचला ठरल्याप्रमाणे निखील पगारे हा आपल्या पोलिस मित्रासोबत तोतया अधिकारी नितीन पगारे याला उर्वरित पैसे देण्यासाठी धुळे रोडवरील हॉटेलजवळ गेला. त्यावेळी संशयित नितीन पगारे याने आपण वन विभागात कुठल्याही पदावर नसल्याची कबुली दिली.

नितीन पगारे व त्याचा साथीदार वाघ या दोघांना पोलिस ठाण्यात नेले. निखील पगारे याच्या फिर्यादीवरून नितीन रवींद्र पगारे व वाघ (रा. ग्रामसेवक कॉलनी, चाळीसगाव) या दोघांच्या विरोधात येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे करीत आहेत.

"या गुन्ह्यातील संशयित नितीन पगारे याच्या विरोधात यापूर्वीही असेच फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत. अशा पद्धतीने कोणाची फसवणूक झाली असल्यास, त्यांनी पोलिसांना कळवावे. जेणे करुन तोतया अधिकाऱ्यावर कठोरातील कठोर कारवाई करता येईल."

- प्रवीण दातरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे (ता. चाळीसगाव)

Criminal arrested
Nashik Crime News : नैसर्गिक विधीला जाताच दुचाकी लंपास; शहरातून 3 दुचाक्या लंपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.