Jalgaon Fraud Crime : खोटे लग्न लावून तरुणाची आर्थिक फसवणूक; मुलाकडून उकळले 55 हजार

Jalgaon Fraud Crime : खोटा विवाह लावून मुलाकडून ५५ हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

तोंडापूर : खोटा विवाह लावून मुलाकडून ५५ हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फर्दापूरपासून जवळच असलेल्या वाघूर नदीच्या काठावरील चौंडेश्वर मंदिरात गुरवारी (ता. १८) दुपारी एकच्या सुमारास हा विवाह लावून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी फर्दापूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime Financial fraud of youth by fake marriage)

मुलींची संख्या कमी असल्याने अनेक तरुणांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत, अशाच तरुणांना हेरून त्यांच्या सोबत लग्नाचे नाटक करीत त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे सोयगाव तालुक्यातील प्रकरण ताजे असतानाच आणखी एक प्रकार उघड झाला आहे. खोटे लग्न लावून देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या सात जणांविरुद्ध फसवणूक.

झालेले संजय बाळाराम साकळे (वय २६, रा.पळसखेडा, ता. सोयगाव) याने दिलेल्या फिर्यादीवरून फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयितांची नावे अशी आहेत : सीताराम महिपाल सोनवणे (रा.पहूर, ता. जामनेर), रोशनी अशोक पवार (रा. गणपती मंदिराच्या पाठीमागे, नाशिक, खरे नाव पूनिता शंकर कामटे, रा. दर्या, ता. दरभंगा, बिहार).

सुमन प्रकाश जाधव (रा. चिंचोली रोड, नाशिक, खरे नाव पूजा अनिल वाल्मीकी, रा. महानगरपालिका शाळेसमोर, वैद्यवाडी, हडपसर, पुणे), रंजना कैलास यालिस (रा. इंद्रकुंड, पंचवटी, ता. जि. नाशिक), मीरा अनिल डांगे (रा. लोणी खुर्द, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर). (latest marathi news)

Fraud Crime
Jalgaon Lok Sabha Constituency : भाजप या वेळी विजयात ‘पास’ होणार की ‘फेल’

रेणुका कमलाकर वस्त (रा. गणेश चाळ टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे), अनिल सुखदेव डांगे (रा. लोणी खुर्द, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजी नगर) यांच्याविरुद्ध फर्दापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितांनी गुरुवारी (ता. १८) सोयगाव तालुक्यातील धनवट शिवारातील वाघूर नदीकाठी असलेल्या चौंडेश्वर मंदिरात मुलाकडून ५५ हजार रुपये घेऊन खोटा विवाह लावून दिला होता.

"विवाह रखडलेल्या मुलांच्या परिवाराने लग्न लावून देतो म्हणून पैशाची मागणी करणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, या अगोदर ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झालेली असेल त्यांनी पोलिसांची संपर्क साधावा." - प्रफुल्ल साबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक

Fraud Crime
Jalgaon Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक निश्चित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.