Jalgaon Crime News : शहरातील जळगांव रोड वरील तलाठी कॉलनी भागातील सोनेश्वर गणपती मंदिरातील परिसरात शिबिर लावून आयुर्वेदिक जडीबुटीच्या नावाखाली विना परवाना औषधे विक्री करणाऱ्यावर अन्न औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून हजारो रुपयांचा मुद्देमालासह विक्री करणाऱ्या बोगस वैद्य सतबीर देसराज शर्मा वय (३०, हरियाना, हल्ली मुक्काम जळगांव याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. (Jalgaon Crime Food and Drug Prevention Department has taken action against those selling unlicensed medicines)
तर त्याचा एक साथीदार पळून गेला. जुन्या आजार, दुखणे बरे करण्याचा दावा करीत आयुर्वेदिक औषधांच्या नावाने जडीबुटीसह काही विक्री करणाऱ्या कथित शिबीराविषयी अनेक तक्रारी असल्याने या विभागाने अन्न व औषध प्रशासन प्रभारी सहायक आयुक्त श्री.अनिल मानिकराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
याप्रकरणी जामनेर उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ विनय पंढरीनाथ सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर भागात काही महिन्यांपासून अशा शिबीरात आजारी रुग्णांची यात्रा भरायची.
आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली खुले दुकानदारी चालायची. कुठल्याही प्रकारची पावती न देता दिशाभूल करीत असल्याचा संशयास्पद प्रकार वाटल्याने काही नागरीकांनी अन्न व औषध प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. छाप्यात हस्तगत केलेली कथित बनावट औषधे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.