Jalgaon Crime News : फरार सराफा कारागीरास धावत्या रेल्वून अटकेत

Jalgaon News : सोने घेवून पसार झालेल्या शेख अमीरुल हुसेन या कारागिराला धावत्या रेल्वेतून तूमसर रोड येथून नागपूर रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या मदतीने शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले.
Crime
Crimeesakal
Updated on

Jalgaon crime News : सराफ व्यापाऱ्यांचे १७ लाख रुपयांचे सोने घेवून पसार झालेल्या शेख अमीरुल हुसेन या कारागिराला धावत्या रेल्वेतून तूमसर रोड येथून नागपूर रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या मदतीने शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयीताकडून २५६ ग्रॅमपैकी ९७.८८० ग्रॅम सोने पोलिसांनी जप्त केले आहे.

सोन्याचे व्यापारी शुभम प्रदीप वर्मा (वय-३०,रा.लक्ष्मी नगर) यांनी दागिने घडवण्यासाठी कारागिर शेख अमीरुल हुसेन (२८, रा. पश्चिम बंगाल, ह.मु. जोशी पेठ, जळगाव) याला १५ लाख रुपयांचे २२५ ग्रॅमची सोन्याची लगड दिली होती.

या सोन्यासह खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा (रा. जळगाव) यांची दोन लाख रुपये किंमतीची ३१ ग्रॅम वजनाची चैन असे एकूण १७ लाख रुपये किमतीचे २५६ ग्रॅम वजनाचे सोने घेऊन संशयीत शेख अमीरुल हुसेन हा पसार झाला होता. गुन्हा दाखल झाल्यावर शनिपेठ पोलिसांनी रेल्वे पोलिसदलासहीत राज्यातील विविध पोलिसांना तसेच रेल्वे सुरक्षा बलाला दिली.

Crime
Crime News: बोईसरमध्ये देशी पिस्तुलासह एकाला अटक

शेख हा मुंबई-हावडा मेलने पश्चिम बंगालच्या दिशेने निघाला असल्याची माहिती मिळताच तुमसर रोड रेल्वे स्थानकावर तो पोहचताच कोच एक नंबर बोगीत दडून बसलेल्या अमीरूल शेख याला रेल्वे पेालिस बलाने ताब्यात घेतल्यावर त्याच्या मागावर असलेल्या शनिपेठ पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली.

उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, रवी तायडे यांच्या पथकाला संशयीताला सोपविण्यात आले असून प्राथमीक चौकशीत त्याच्या जवळून बॅगमध्ये ९७.८८० ग्रॅम सोने मिळून आले असून हे सोने तत्काळ जप्त करण्यात आले आहे.

Crime
Mumbai Crime: पत्नी सोबत राहत नसल्याने दादर, कल्याण स्थानके उडवण्याची दिली धमकी; पोलिसांनी केली अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.