रावेर : ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या सहा जणांच्या एका टोळीला मंगळवारी (ता. २४) छापा टाकून रावेर पोलिसांनी अटक केली आहे. कॉल सेंटरद्वारे प्रलोभन देऊन जुगार खेळविणाऱ्या टोळीवर नाशिक विभागातील ही पहिलीच कारवाई असून, १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. येथील पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार येथील सुमन नगर भागातील दत्तू कोळी यांच्या राहत्या घरात काही व्यक्ती हे मोबाईल फोन आणि लॅपटॉपच्या साह्याने ऑनलाइन गेम ॲप तयार करून लोकांना आमिष दाखवून त्यावर पैशांच्या हार जीतचा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना पैशांची गुंतवणूक करण्यासाठी प्रलोभन देत असल्याची माहिती मिळाली. (Gang of 6 people arrested for online gambling )
त्यावरून त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव, पोलिस कर्मचारी रवींद्र वंजारी, सचिन घुगे, विशाल पाटील, सुनील वंजारी, प्रमोद पाटील, महेश मोगरे, समाधान ठाकूर, संभाजी बिजागरे यांनी छापा टाकला असता तिथे ६ जण आढळून आले. www.wood 777.com या वेबसाईटवर व्हॉट्सअपद्वारे लिंक पाठवून लोकांना वेगवेगळे ऑनलाइन जुगार खेळण्याकरता प्रोत्साहन देत असताना अभिषेक बानीक, नागपूर, साहिल खान वकील खान, अंकित चव्हाण, गणेश कोसल ( सर्व रा. पंधाना, जि. खंडवा), बलबीर सोळंकी (रा. जावल, जि. खंडवा), साहिद खान जाकीर खान (रा. खडकवाणी, जि. खंडवा) या ६ जणांना पोलिसांनी पकडले आहे.
त्यांच्याकडून ९ मोबाईल फोन २ लॅपटॉप यासह एकूण १ लाख १५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व संशयित आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाइन जुगारद्वारे रोज सुमारे कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या टोळीवर गुन्हा दाखल करण्याची नाशिक विभागातील ही पहिलीच घटना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.