Jalgaon Crime : शेतशिवारातून वीजतारा चोरणारी टोळी अटकेत; डीपी बंद पाडून खांबावरून तारांची चोरी

Jalgaon Crime : तीन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून ३ हजार ८०० मीटर वीजतारा जप्त करण्यात आल्या आहेत.
Crime Branch team with arrested suspects
Crime Branch team with arrested suspectsesakal
Updated on

जळगाव : शेतातून गेलेल्या वीज खांबांवरून वीजतारांची चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हेशाखेने छडा लावला असून, या प्रकरणी तीन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून ३ हजार ८०० मीटर वीजतारा जप्त करण्यात आल्या आहेत. अटकेतील संशयितांनी तब्बल पाच मोठ्या गुन्ह्यांची कबुली दिली असून, एरंडोलसह इतरही तालुक्यात चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. एरंडोलसह धरणगाव तालुक्यातील शेतशिवारांमध्ये उभ्या वीज खांबांवरील तारा चोरीला जाण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. ( gang that stole electricity wire from farm was arrested )

एकट्या एरंडोल पोलिस ठाण्यात या प्रकरणी पाच वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असताना तारा चोरणारे पोलिसांना सापडतच नव्हते. जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या तक्रारींची दखल घेत गुन्हेशाखेला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील उपनिरीक्षक राहुल तायडे, संदीप मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी यांच्या पथकाने एरंडोल शिवारात खबऱ्यांना सतर्क करून या प्रकरणी मिळालेल्या गुप्त माहितीचा पाठपुरावा करत असताना रवींद्र अनिल मिस्तरी (वय ३८, रा. एरंडोल साईनगर), धनराज प्रकाश ठाकूर (वय ४६, रा. अमळनेर दरवाजा), समाधान नारायण पाटील (वय ४५, एरंडोल, नारायणनगर) या तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसी ‘खाक्या’ दाखवताच तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, ३ हजार ८०० मीटर वीजतारांचे बंडल काढून दिले आहेत. तिघांना अटक करून एरंडोल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Crime Branch team with arrested suspects
Jalgaon Crime : पारोळ्यात दगडफेक; 4 पोलिस जखमी, 24 जणांवर गुन्हा

अशा करीत चोऱ्या

मध्यरात्रीच्या सुमारास शेतशिवारातील वीज डीपीवरून एक व्यक्ती वीजपुरवठा खंडित करीत होता. इतर दोघे वीज खांबांवर चढून तारा कापून त्यांचा गुंढाळणी करून पसार होत असे. अटकेतील तिघांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून इतरही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Crime Branch team with arrested suspects
Jalgaon Crime : ‘वॉरंट’वरील गुन्हेगारांचे अटकसत्र; ‘एसपीं’च्या तंबीनंतर महिनाभरात 201 संशयित गजाआड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.