Jalgaon Crime : उपचारासाठी मुंबईत गेलेल्यांचे मोहनगरातील घर फोडले! मोबाईलसह चांदीचे दागिने, रोकडसह लाखाचा ऐवज लंपास

Latest Crime News : घरातून रोकडसह मोबाईल व चांदीची दागिने असा एकूण ९५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत येथील रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Burglary Crime News
Burglary Crime Newsesakal
Updated on

Jalgaon Crime : शहरातील मोहननगरातील रहिवासी दिलीपकुमार रामदास सोळुंखे कुटूंबीयांसह मुंबई येथे रुग्णालयाच्या कामासाठी गेलेले होते. त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातून रोकडसह मोबाईल व चांदीची दागिने असा एकूण ९५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत येथील रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (gone to mumbai people Mohnagar house robbed)

शहरातील मोहननगरात दिलीपकुमार सोळुंखे हे वास्तव्यास असून, ते गेल्या २१ सप्टेंबरला मुंबई येथे रुग्णालयाच्या कामानिमित्त गेलेले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी २१ ते २७ सप्टेंबरदरम्यान त्यांच्या बंदघराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

त्यानंतर सोळुंखे यांच्या घरातून २० हजार रुपयांचा मोबाईल, ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे गणपती, ५० हजार रुपयांची रोकड, साडेचार हजार रुपयांची गल्ल्यातील रोकड यांसह घराचे खरेदीखत, महत्वाची कागदपत्रे असा एकूण ९४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

दरम्यान, काल शुक्रवारी (ता.२७) सायंकाळच्या सुमारास सोळुंखे यांच्या शेजारच्यांनी त्यांना फोन करून तुमच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. सोळुंखे यांनी पीडबल्यूडी ऑफिसमध्ये शाखा अभियंता असलेले त्यांचे व्याही रवींद्र बाविस्कर यांना घरी जावून पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार ते सोळुंखे यांच्या घरी गेले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा होता आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. (latest marathi news)

Burglary Crime News
Nashik Crime News : अवैध सावकारी करणारा लागेना पोलिसांच्या हाती! पोलिस तपासावर संशयाची सुई

चोरट्यांनी सोळुंखे यांच्या घरातल्या कपाटात असलेला सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता, तर त्यांच्या घरातून मौल्यवान ऐवज चोरून नेल्याची खात्री झाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रवींद्र बाविस्कर यांनी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास रामानंदनर पोलिस करीत आहेत.

घटनांत वाढ झाल्याने भीती

जळगाव शहरासह परिसरात चोरीच्या घटनांत गेल्या काही दिवसांपासून वाढ झालेली आहे. त्यामुळे शहरातील कॉलन्यांसह परिसर व उपनगरांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. म्हणून घरबंद ठेवून बाहेर जाण्याबाबतही नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन शहरासह परिसरातील रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Burglary Crime News
Nashik Crime News : व्हिडिओ व्हायरलची धमकी देत अत्याचार; संशयितावर ॲट्रोसिटीअन्वये गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.