Jalgaon Crime News : मुक्ताईनगरला 22 लाखांचा गुटखा जप्त; संशयितास अटक

Jalgaon Crime : मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनातून २२ लाखांचा गुटखा जप्त केला.
Vehicle impounded by police.
Vehicle impounded by police.esakal
Updated on

Jalgaon Crime News : मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनातून २२ लाखांचा गुटखा जप्त केला. वाहनचालकास अटक केली आहे. ही कारवाई मुक्ताईनगर पोलिसांनी बुधवारी (ता. २४) रात्री बाराच्या सुमारास केली. पोलिस उपअधीक्षक राजकुमार शिंदे यांना स्कॉर्पिओतून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिस पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिस पथकाने पंचाबरोबर स्मशानभूमीसमोरील रोडवर नाकाबंदी केली. (Gutkha worth 22 lakh seized from Muktainagar )

पावणेआठच्या सुमारास काळ्या रंगाची स्कॉर्पिओला पोलिसांनी इशारा करताच चालकाने रस्त्याच्या कडेला थांबविले. स्कॉर्पिओ (एमएच २७, डीएल २४९६)चालकाची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव अजीज शेख बाबू (वय ३६, रा. झाँनगर, रिसोड, जि. वाशिम) असे सांगितले. वाहनात २२ लाख ३८ हजार ५० रुपयांचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, गुटखा आढळून आला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Vehicle impounded by police.
Jalgaon Crime News : दुचाकी लांबवणारी एरंडोलची टोळी अटकेत; चोरीच्या 8 दुचाकींसह शहर पोलिसांच्या जाळ्यात

संशयित अजीज बाबू यास न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयाने २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक राजकुमार शिंदे, निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बोरकर व राजेंद्र खनके, पोलिस कर्मचारी छोटू वैद्य, देवसिंग ताब, विशाल सपकाळे, निखिल नारखेडे यांनी केली. उपनिरीक्षक प्रशांत बोरकर तपास करीत आहेत.

Vehicle impounded by police.
Jalgaon Crime News : गोरक्षकांनी वाचविले गायींचे प्राण! 2 गायींसह वासराची सुटका; मेहुणबारे पोलिसांची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com