एरंडोल : येथील हॉटेल मयूरी गार्डनजवळ सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा टाकून सुमारे एक लाख ३१ हजार १४० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. दरम्यान, शहरात सहा पत्त्यांचे क्लब बिनधास्तपणे सुरू असताना, केवळ एका क्लबवर कारवाई केल्याने पोलिसांच्या कारवाईबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. (Jalgaon Crime IG Squad Raid Erandol Club case filed against 8 persons)