Jalgaon Crime: चोपडा येथील माणक ज्वेलर्सची चौकशी! शहरात चर्चेला उधाण; चोरीचे सोनेप्रकरणी मेन रोडवरील व्यापाऱ्याची चौकशी

Crime News : शहादा पोलिसांनी प्रवीण आनंदराज टाटिया व नवीन प्रवीण टाटिया यांची चोपड्यात येऊन चौकशी केली.
Manak Jewelers
Manak Jewelersesakal
Updated on

चोपडा : दोन महिन्यांपूर्वी शहादा येथील घरफोडीत चोरी झालेल्या सोन्याच्या तपासकामी शहरातील मेन रोडवरील माणक ज्वेलर्सचे मालक प्रवीण आनंदराज टाटिया व नवीन प्रवीण टाटिया या बापलेकाची चोरीचे सोनेप्रकरणी शहादा पोलिस व नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे अधिकारी यांनी चौकशी केली. त्यात त्यांची दुकानात व नंदुरबार येथे बोलावून कसून चौकशी करण्यात आली. त्यामुळे शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. (Jalgaon Crime Investigation of Manak Jewelers in Chopra)

दोन तीन महिन्यांपूर्वी शहादा येथे घरफोडी झाली होती. त्यात सोन्यासह मुद्देमाल चोरीला गेला होता. त्या पार्श्वभूमीवर शहादा पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यात त्यांनी चोरी केलेला सोन्याचा माल चोपडा येथील मेन रोडवरील माणक ज्वेलर्सचे मालक प्रवीण आनंदराज टाटिया व नवीन प्रवीण टाटिया यांना विकल्याचे सांगितले होते.

त्यावरून शहादा पोलिसांनी प्रवीण आनंदराज टाटिया व नवीन प्रवीण टाटिया यांची चोपड्यात येऊन चौकशी केली. त्यात सदर घटनेतील चोरीचे सोने खरेदी केले आहे काय? याबाबत साशंकता पोलिसांना आल्याने त्यांनी या दोघांना नंदुरबार येथे बोलावून चौकशी केली. घरफोडीबाबत पोलिस चौकशीकामी दोन दिवसांपूर्वी शहरात आले होते. चोरीच्या सोनेप्रकरणी शहरात अशी चौकशी यापूर्वीही झालेली असल्याने चर्चेला उधाण आले आहे. (latest marathi news)

Manak Jewelers
Crime News : अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत देहविक्री; दांपत्यासह महिलेवर गुन्हा दाखल

"शहादा येथे घरफोडीबाबतचा गुन्हा दाखल आहे. याबाबत चोपडा येथे चौकशी केली आहे. पुढील तपास सुरू आहे. संबंधित प्रकरण शहादा पोलिसांकडे आहे."

- किरण खेडकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हा शाखा, नंदुरबार.

"माझ्याकडे पोलिस आले होते. चौकशी केली. पण पोलिसांना काही मिळाले नाही. चौकशीकामी नंदुरबार येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मला नंदुरबार येथे चौकशीसाठी बोलाविले होते. याबाबत चौकशी केली आहे."- प्रवीण आनंदराज टाटिया, संचालक, माणक ज्वेलर्स, चोपडा.

"शहादा येथील घरफोडीतील सोने हे चोपडा येथे विकले असल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. त्यानुसार चोपडा येथील सोनेविक्रेते व्यापाऱ्याची चौकशी सुरू आहे. मागील पाच दिवसांपासून मी रजेवर आहे. म्हणून आत्ताच याबाबतीत जास्त सांगू शकत नाही. मात्र, घरफोडीचा गुन्हा आमच्याकडे दाखल आहे. त्यादिशेने तपास सुरू आहे."

-शिवाजी बुधवंत, पोलिस निरीक्षक, शहादा (जि. नंदूरबार)

Manak Jewelers
Nagpur Crime : नशेत झालेल्या वादातून बापलेकांनी केला मित्राचा खून; वकिलासह मुलाला कोठडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.