Jalgaon News : सावत्र बापाने आईच्या संमतीने तीनवर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना येथे घडली. याबाबत सावत्र बाप व सख्ख्या आईच्या विरोधात रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. येथील न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांची मंगळवार (ता. ४)पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. (Crime Little girl killed by stepfather)
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. बेलसवाडी (ता. मुक्ताईनगर) येथील रहिवासी माधुरी हिचा वारोली (बऱ्हाणपूर- मध्य प्रदेश) येथील भारत मसाणे याच्याशी २०१७ मध्ये विवाह झाला होता. माधुरीला पहिल्या पतीपासून मुलगा पीयूष (वय ५) व आकांक्षा (३) आहे. मात्र, पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलांसह बेलसवाडी येथे राहत होती. त्यानंतर माधुरीने रावेर येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसांपूर्वी लग्न केले.
तेव्हापासून दोन्ही मुले रावेर येथील आंबेडकरनगरात अजयकडे राहत होती. शुक्रवारी (ता. ३१) अजयने सकाळी नऊच्या सुमारास सावत्र मुलगी आकांक्षा हिला दांड्याने मारले, तसेच गळा आवळला. ही घटना अजयची पत्नी माधुरीस माहीत असताना पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीला पती-पत्नीने बेलसवाडी येथे नेले. (latest marathi news)
मात्र, माधुरीचा पहिला पती व मुलीचे सख्खे वडील भारत म्हसाणे यांना हे समजल्यावर त्यांनी बेलसवाडी गाठले. त्यांनी मुलगा पीयूष याला विचारणा केल्यावर दुसऱ्या पप्पाने मारले, असे सांगितले. म्हसाणे यांना मुलीच्या गळ्याजवळ आवळल्याच्या खुणा दिसून आल्याने त्यांनी अंतुर्ली पोलिस चौकीत मुलीला नेले. पोलिसांनी तेथून मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तेथे तपासणी केली असता मुलीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
शवविच्छेदनाअंती मुलीचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने मुलीची सख्खी आई व सावत्र बाप या दोघांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, खुनाचे कारण समजू शकले नाही. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आशिषकुमार अडसूळ तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.