Jalgaon Crime News : अवैध वाळु वाहतुकीचा मिनी ट्रक पकडला

Jalgaon Crime : अवैध गौण खनीज वाहतूक करताना टाटा कंपनीचा ट्रक आढळल्याने ट्रक जप्त करत वाहन चालकासह तिघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
Crime
Crimeesakal
Updated on

Jalgaon Crime News : तालुक्यातील किनगाव ते डांभुर्णी दरम्यान फैजपुर विभागीय सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह व त्यांच्या पथकाला गस्तीवर असताना शुक्रवारी मध्यरात्री अवैध गौण खनीज वाहतूक करताना टाटा कंपनीचा ट्रक आढळल्याने ट्रक जप्त करत वाहन चालकासह तिघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. (Jalgaon Crime mini truck carrying illegal sand was caught)

Crime
Nagpur Crime: गुन्हेगारांच्या हॉटस्पॉटचा आढावा घेण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर, कपिलनगर ते कळमनापर्यंत काढला रुटमार्च

शनिवारी (ता.९) पहाटे एकच्या सुमारास फैजपुर विभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह व पथक रात्री किनगाव ते डांभुर्णी रस्त्यावर गस्त घालीत असताना जळगाव कडून किनगाव कडे येणाऱ्या (एमएच ४८ टी २५७६).

टाटा कंपनीच्या तपकिरी रंगाच्या गाडीवर ताडपत्री बांधून त्यात अवैधगौर घरीच वाहतूक करताना ड्रायव्हर सुधाकर मधुकर सपकाळे सोपान नामदेव सोनवणे राहणार खेडी आव्हाना तालुका जळगाव हे विनोद शितोळे एसटी कॉलनीच्या सांगण्यावरून अवैध गुण खनिज वाहतूक करीत होते.

कुठलाही वाहतुकीचा परवाना नसताना चोरीची वाळू वाहतूक बाबत त्यांच्या विरुद्ध उप अधिक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून विरुद्ध गुन्हा दाखल करीत ट्रक जप्त करीत गुन्हा दाखल आला. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हेल कॉन्स्टेबल नरेंद्र बागुले हे करीत आहेत

Crime
Mumbai Crime: फसवणुकीच्या १० वर्षे जुन्या प्रकरणातील आरोपी अटकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.