Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलांनी चोरल्या 8 दुचाकी; भुसावळ, मुक्ताईनगर चोरी केलेली सर्व वाहने तिघांकडून हस्तगत

Jalgaon Crime : पोलिस अंमलदार यांना चोरीस गेलेल्या गुन्ह्यातील एकूण आठ दुचाकी विधिसंघर्ष बालकांकडून हस्तगत करण्यात यश आले आहे.
Police inspector Gajanan Padghan and staff while detaining the stolen bike.
Police inspector Gajanan Padghan and staff while detaining the stolen bike.esakal
Updated on

Jalgaon Crime News : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलिस अंमलदार यांना चोरीस गेलेल्या गुन्ह्यातील एकूण आठ दुचाकी विधिसंघर्ष बालकांकडून हस्तगत करण्यात यश आले आहे. या प्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी भुसावळ उपविभागातील सातत्याने होत असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. (Minors stole 8 bikes arrested by police )

त्या सूचनांप्रमाणे पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव व इतर पोलिस अंमलदार यांचे तपास पथक तयार करुन तपास सुरू केला. या तपास पथकामार्फत दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रयत्न सुरू असताना या पथकाला खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली, की मुक्ताईनगर तालुक्यातील संशयित हे चोरीतील दुचाकी घेऊन न्यू एरिया वॉर्ड, भुसावळ या परिसरात दुचाकी चोरी करण्याच्या उद्देशाने येणार आहेत.

Police inspector Gajanan Padghan and staff while detaining the stolen bike.
Jalgaon Crime News : संबंध ठेवून विवाहास तरुणाचा नकार; अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने २२ मेस रात्री सापळा लावून या संशयितास नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यात असलेली दुचाकी ही चोरीची असून, याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यास या गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो अल्पवयीन असल्याचे लक्षात आले.

त्याने त्याचे इतर दोन अल्पवयीन साथीदारांसह एकूण ८ दुचाकी भुसावळ, जळगाव व मुक्ताईनगर या परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. या तपासादरम्यान पथकाने एकूण आठ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या अल्पवयीन मुलांमागे आणखी कोणी सहभागी आहे, याबाबत अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलिस कर्मचारी विजय नेरकर, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, जावेद शहा, अमर अढाळे, प्रशांत लाड यांनी केली.

Police inspector Gajanan Padghan and staff while detaining the stolen bike.
Jalgaon Crime News : शहरात पुन्हा खुनाचा थरार! हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेल्या दोघांवर सशस्त्र हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com