Jalgaon Crime News : मोहाडी गावात अक्षय तृतीयेच्या दिवशी जुन्या भांडणात पोलिसांना बोलावले म्हणून भांडण मोडण्यास आलेले सरपंच धनंजय सोनवणे व जिल्हापरिषद सदस्य पवन सोनवणे यांच्या जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील घरावर हल्लेखोरांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime Mohadi stone pelting case news)
एमआयडीसी पोलिसांत शनिवारी दाखल गुन्ह्यात नमुद केल्या प्रमाणे, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या मोहाडी गावात शुक्रवार (ता. १०) मे जुन्या वादातून मोहाडी ग्रामस्थ काशिनाथ गवळी यांच्या घरावर हल्ला करून मारहाण झाली होती.
गावाचे सरपंच असल्याने गावातून फोन आल्याने धनंजय भिलाभाऊ सोनवणे (वय-३३) शहरातील काम आटोपून मोहाडीत पोहचले. तत्काळ त्यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांना फोन केला. तेव्हा हल्लेखोर पळून गेले. एमआयडीसी पोलिसांत काशिनाथ गवळी तक्रार देण्यास गेले असता त्याची तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.
सरपंचाच्याच घरावर हल्ला
मोहाडी सरंपच धनंजय सोनवणे,भाऊ पवन सोनवणे असे जळगाव शहरात मोहाडी रोडवर इंपिरियल अपार्टमेंट मध्ये कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. गावाचा वाद मिटत नाही तोवर, सायंकाळी साडे सातच्या सुमारास मोहाडी रोडवरील त्यांच्या घरावर काही हल्लेखोरांनी हल्ला चढवत वाहनाची नासधूस करून घराच्या काचा फोडल्या.
घराच्या गॅलरीत आणि खिडकीचे काच फोडल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी प्रभारी निरीक्षक बबन आव्हाड, यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, नाना तायडे व एमआयडीसी ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. (latest marathi news)
गुन्हा दाखल
सरपंच धनंजय सोनवणे यांच्या तक्रारीवरून आज एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून त्यात नमुद केल्या प्रमाणे, दीपक हटकर, सागर हटकर, अंकुश हटकर, गोलू हटकर, महेंद्र हटकर, भरत हटकर, अर्जुन हटकर, आकाश हटकर यांच्या विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील करत आहेत.
पत्त्यांच्या डावात वाद
अक्षयतृतीयेनिमित्त बसलेल्या जुगाराच्या डावात वाद होवुन त्यानंतर मोहाडी गावात दुपारी हल्ला करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी जळगाव येथे हल्लेखोरांनी सरंपच धनंजय सोनवणे व पवन सोनवणे यांच्या घरावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.