Jalgaon Crime News : राष्ट्रीय महामार्गावर चाकूचा धाक दाखवत लाखाची लूट! चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Crime News : कर्मचाऱ्याच्या लुटीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे
Crime News
Crime Newsesakal
Updated on

एरंडोल : राष्ट्रीय महामार्गावर बँकेत भरणा करण्यासाठी जात असलेल्या कर्मचाऱ्याची दुचाकी अडवून चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. कर्मचाऱ्याच्या लुटीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे. (Jalgaon Crime national highway Looting of lakhs)

राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल कृष्णासमोरील महाजननगराजवळ पद्मालय गॅस एजन्सीचे कार्यालय आहे. एजन्सीचे सहाय्यक व्यवस्थापक राजेंद्र पाटील ४ लाख ९१ हजार रुपये दुपारी एकच्या सुमारास सेंट्रल बँकेत भरण्यासाठी दुचाकीने जात होते. राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधकाजवळ राजेंद्र पाटील आले असता, त्याठिकाणी विनाक्रमांकच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांच्या ताब्यात असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला.

राजेंद्र पाटील यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी पाटील यांना चाकूचा धाक दाखवला. राजेंद्र पाटील व चोरट्यांमध्ये झालेल्या झटापटीत राजेंद्र पाटील यांच्या पिशवीतून पाचशे रुपयांचे दोन बंडल रस्त्यावर पडल्यामुळे चोरट्यांनी एक लाख रुपयांचे पडलेले बंडल घेऊन पोबारा केला. झटापटीत राजेंद्र पाटील यांच्या हाताला जखम झाली आहे. चोरट्यांचा लुटीचा थरार सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (latest marathi news)

Crime News
Crime News : AC च्या थंड हवेत चोराला लागली झोप, पोलिसांनीच केलं जागं अन्...

राजेंद्र पाटील यांची चोरट्यांशी झटापट होत असताना, राष्ट्रीय महामार्गावरून वाहनाची वाहतूक सुरू असतानाही त्याठिकाणी वाहनचालक थांबले नसल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. राजेंद्र पाटील यांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्यामुळे पिशवीतील तीन लाख ९१ हजार सुरक्षित राहिले. दोन्ही चोरटे ३५ ते ४० वयोगटातील असून, त्यांनी चेहरा रूमालाने बांधला होता.

याबाबत राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे तपास करीत आहेत. दरम्यान, दुपारी राष्ट्रीय महामार्गावर एक लाख रुपयांची लूट झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

Crime News
Nagpur Crime : पित्याचा दोन लेकींवर अत्याचार; नराधम बापाला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.