Jalgaon Crime News : विम्यावर अधिक बोनस व मेडिकल कव्हर मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखांत फसवणूक केल्याच्या अनेक घटना जिल्ह्यासह राज्यात घडत असून जळगाव सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे संपर्काचे कॉलसेंटर दिल्लीत, भामट्यांचे अकाऊंट ऑपरेटिंग उत्तर प्रदेशातून आणि लूटलेली रक्कम गोव्यात विड्रॉल करणाऱ्या दोघांना जळगाव सायबर पोलिस पथकाने गोव्यातून अटक केली. (Jalgaon police team arrested cyber criminals from Goa)
अवधेशकुमार रामकिशोर (वय-२४) व रामप्रसाद निशाद लल्लू निशाद (वय-२५) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून या स्वरूपाचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अशी आहे ऑपरेंडी
सायबर पोलिस ठाण्यात डिसेंबर महिन्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तपास पथकाला तांत्रिक विश्लेषणातून असे आढळून आले की, जिल्ह्यासह राज्यातील खासकरून मराठी व्यक्तींना संपर्क करून त्यांना विमा पॉलिसीतून अधिक बोनस व मेडिकल कव्हर मिळवून देण्याचे आमिष देत किंवा शेअर बाजारांत गुंतवणुकीचे आमिष देत गंडवण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून मुळ दिल्लीच्या कॉल सेंटरमधून संपर्क करून उत्तरप्रदेशातील ‘क्ष’ खात्यामध्ये पैसे मागवले जातात.
तेथून गोवा येथील खात्यात वर्ग करून त्या खात्यातून पैसा विड्रॉल करत तिसऱ्याच वेगळ्या खात्यात भरणा केला जात असल्याचे आढळून आले आहे.
तीस हजार रुपये महिना
अटकेतील दोघांना फक्त गोव्यातून ठराविक बँकांमधून संबंधित खात्यात जमा झालेली रक्कम ‘विड्रॉल’ करून ती, वेगळ्या खात्यात भरणा करण्याचे काम दिले गेले असून या साठी प्रत्येकी तीस हजार रुपये महिना आम्हाला त्यासाठी दिला जात असल्याचे अटकेतील दोघांनी माहिती देताना सांगितले. या मागे मोठ्ठे रॅकेट असून दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून हा फसवणुकीचा धंदा चालवला जात असल्याचे सांगण्यात आले.
गोव्यातून काढले पैसे
सायबर पोलिसांत दाखल गुन्ह्यात तशाच पद्धतीने मडगाव, गोवा येथील एटीएममधून सदर खात्यावरून रक्कम काढल्याचे जळगाव सायबर पोलिसांना समजतात त्यांनी संबंधित बँकेकडून तेथील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले.
त्याआधारे सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दिगंबर थोरात,दिलीप चिंचोले,गौरव पाटील, दीपक सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे ईश्वर पाटील,प्रवीण वाघ,राजेश चौधरी अशांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावत अवधेशकुमार रामकिशोर व रामप्रसाद निशाद लल्लू निशाद या दोघांना गोवा येथून अटक केली.
अटक केलेल्या दोघांकडून मोबाईल, सिमकार्ड, चेकबुक, डेबिट कार्ड व इतर साहित्य हस्तगत केले. या दोघांकडून जिल्ह्यातील आणि राज्यातील इतरही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.