Jalgaon Crime News : सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकाऱ्यास मारहाण! आमदार येऊन गेले अन्‌ कंत्राटदाराकडून मारहाण

Latest Crime News : कंत्राटदाराच्या बिल काढण्यावरून ही मारहाण झाल्याची चर्चा असून, संबंधित विभागात संपर्क केला असता, कोणीही माहिती देण्यास तयार नसल्याने नेहमीप्रमाणे या प्रकरणी गुन्हा नोंदविला जाण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

Jalgaon Crime News : जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोरील सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्यास मारहाण झाल्याची घटना गुरुवारी (ता. २६) समोर आली. कंत्राटदाराच्या बिल काढण्यावरून ही मारहाण झाल्याची चर्चा असून, संबंधित विभागात संपर्क केला असता, कोणीही माहिती देण्यास तयार नसल्याने नेहमीप्रमाणे या प्रकरणी गुन्हा नोंदविला जाण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे. (Officer beaten by contractor in PWD)

सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदार, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अधिकारी, अभियंता व कर्मचाऱ्यांना सतत मारहाण होत असल्याचे दिसून येते. सहा महिन्यांपूर्वी एका आमदारपुत्रासह त्याचा मित्र कार्यालयात रस्त्यांच्या कंत्राट निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कार्यालयात आला होता.

काही स्थानिक गुंडाच्या टोळक्याने त्यांना घेरून पिस्तुलीचा धाक दाखवत मारहाण केली होती. सोबतच संबंधित अधिकाऱ्यास शिवीगाळ व दमदाटी केली होती. घटना घडल्यानंतर तत्काळ जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात अधिकारी दाखल झाले. मात्र, अधिकाऱ्यांनी तक्रार दिली नाही. (latest marathi news)

Crime News
Pune Crime News: वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट! पोलिस तपासामध्ये मध्य प्रदेश कनेक्शन आलं समोर

सीसीटीव्हीचे वैर

जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जळगाव शहरातील प्रत्येक शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही कार्यान्वीत केले आहेत. मागील प्रकारामुळे जिल्‍हापेठ पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी पत्र देत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना केल्या असून, अद्याप या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याचा वाईट अनुभव पोलिसांना आला. सार्वजनिक बांधकाम विभागाला सीसीटीव्हीचा वैर असल्याचे बोलले जात आहे.

अन्‌ आमदार येऊन गेलेत

विश्वसनीय सूत्रान्वये मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकला आमदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आले होते. आमदार गेल्यानंतर काही वेळातच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून, या घटनेला मात्र कुठलाही दुजोरा शासकीय यंत्रणेद्वारे मिळू शकला नाही. तक्रार आली, तर आम्ही कारवाई करू, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Crime News
Thane Crime News: पोलिस ठाण्यात येऊन महिला पोलिस कर्मचाऱ्यावर ब्लेडने हल्ला; विठ्ठलवाडी ठाण्यात नेमकं काय घडलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.