Jalgaon Crime : महाबळ परिसरातील नागेश्वर कॉलनीत काही दिवसांपासून ‘चड्डी गँग’ने धुमाकुळ घातला आहे. पहाटे चोरी करून पसार होणाऱ्या या टोळीला सोमवारी (ता. १७) तीन घरांमध्ये प्रयत्न करून खाली हात परतावे लागले. सीसीटीव्हीत कैद झालेल्या ‘चड्डी गँग’मुळे महाबळसह नागेश्वर कॉलनी परिसरात दहशत पसरली आहे. (Jalgaon Crime Panic of Chaddi Gang of thieves in Nageshwar Colony)
दक्षिणेकडील महाबळ, नागेश्वर कॉलनी, संभाजीनगर ते रायसोनीनगर, कोल्हे हिल्सचा परिसरात किरकोळ चोऱ्या नेहमीच होतात. काही महिन्यांपासून घर बंद करून कुणी बाहेरगावी गेले की, त्याचे घर फुटलेच, म्हणून समजा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नागेश्वर कॉलनीतील कमलकिशोर गौरीशंकर पांडे (वय ६४) गुरुवारी (ता. ६) सकाळी अकराला घर बंद करुन गेल्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे घर फोडून चोरट्यांनी रोकडसह दागिने लंपास केले. मकरंदनगरात रविवारी (ता. १६) मध्यरात्री दोन ते अडीचला ‘चड्डी गँग’च्या चोरट्यांनी एकामागून एक, अशा तीन घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. याबाबत रामानंदनगर पोलिसांना माहिती दिली आहे.
चोरट्यांनी लढवली शक्कल
नागेश्वर कॉलनीत मुख्य रस्त्यावरून येताना सीसीटीव्हीत येऊ नये,म्हणून चोरट्यांनी छत्रीत डोके झाकले. ज्या घरात चोरी करायचीय, त्याच्याच घरावर सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने अगोदर चोरट्यांनी गेटवर चढून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलली. नंतर कंपाऊंडमध्ये चोरटे शिरले. (latest marathi news)
चोर आले अन् निघून गेले
गुडघ्यापर्यंतची बर्मुडा चड्डी उर्वरित अंग उघडे आणि चेहऱ्यावर रुमाल बांधलेल्या चोरटा मकरंदनगरातील योगेश जोशी यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये शिरला. त्याने दाराचा कडीकोयंडा तोडण्याचा प्रयत्न केला. वरच्या मजल्यावर गॅलरीतून आत जाण्याचाही प्रयत्न केला.
मात्र, श्री. जोशी यांच्या घरात त्याला घुसता आले नाही. गल्लीतील कुत्र्यांनी किंचाळायला सुरवात केल्याने चोरटे माघारी परतले. याबाबत रामानंदनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र, पोलिसांना पाहणी करण्यास उसंतच भेटली नव्हती. चोरीच्या अयशस्वी प्रयत्नामुळेही गुन्हा दाखल झाला नव्हता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.