Jalgaon Bribe Crime : शाळेत शिपाईपदावर नोकरी लावण्यासाठी दहा लाखांची लाच मागून तत्काळ दोन लाखांची लाच स्वीकारणाऱ्या पिंप्री खुर्द (ता. धरणगाव) शाळेतील सचिवाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. विनोद मधुकर चौधरी (वय ५३, रा. गट क्रमांक ५३-५४, साई आनंद अपार्टमेंट, शिव कॉलनी, जळगाव) असे संशयिताचे नाव आहे. (Pimpri Khurd School Secretary arrested for taking bribe)