चोपडा : येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, शहर पोलिस निरीक्षक मधुकर सावळे व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या पथकाने बुधवारी (ता. २०) सायंकाळी सहाच्या सुमारास छापा टाकला.
या छाप्यात एकूण ५० महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, कुंटनखाना चालविणाऱ्या ११ महिलांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (Jalgaon Crime Raid on brothel in Chopda marathi news)
मिळालेल्या माहितीच्या आधारावर चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, शहर पोलिस निरीक्षक मधुकर सावळे व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह पथकाने बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास छापा टाकला.
त्यात जिल्ह्यातील तसेच परराज्यातील ५० तरुणी आढळून आल्या असून, कुंटणखाना चालविणाऱ्या ११ महिलांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या परिसरात पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, नेपाळमधील तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणल्या जात असतात. तेव्हा त्यावर वचक बसण्यासाठी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. ही कारवाई सहा पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.
कुंटणखान्याला होमगार्डचा बंदोबस्त
कुंटणखान्याला होमगार्डच्या दिलेल्या बंदोबस्ताबाबत शहरात चर्चा होती. त्याची तत्काळ दखल पोलिसांनी घेत छापा टाकला. मुळात मुद्दा चार चार होमगार्ड कुंटणखान्यावर का ठेवले होते. ते कळण्याआधीच पोलिसांनी कुंटणखान्यातील महिलांना ताब्यात घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.