अमळनेर : धार्मिक स्थळाची तोडफोड करून फरारी झालेल्या संशयिताला पोलिसांनी बहादरवाडी येथून अटक केली असून, शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले. (Jalgaon Crime Religious place vandalized in Amalner)
रुबजीनगर भागातील धार्मिकस्थळावर रविवारी (ता. २३) सकाळी साडेसातला अफरोज शेख पूजा करायला गेले असता, तेथील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आणि फरशी तोडलेली दिसली. हळूहळू समाजाचे दोनशे लोक जमा झाल्यावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी सुनील नंदवाळकर, निरीक्षक विकास देवरे, एरंडोलचे निरीक्षक सतीश गोराळे, मारवडचे सहाय्यक निरीक्षक शितलकुमार नाईक, हवालदार किशोर पाटील, सिद्धांत शिसोदे, मिलिंद बोरसे, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, प्रमोद पाटील, संजय पाटील, चालक सुनील पाटील, मंगल भोई, राहुल पाटील, प्रशांत पाटील, सुनील जाधव, संतोष पवार, योगेश सोनवणे, पुरुषोत्तम वालडे घटनास्थळी पोचले. (latest marathi news)
जमावाला समजाविण्याचा प्रयत्न केला. महेंद्र भोई उर्फ डोकोमो (रा. बहादरपूर रोड, म्हाडा कॉलनी) रात्रभर त्याठिकाणी थांबून होता, अशी माहिती अफरोज शेख यांना मिळाली. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, म्हणून कसाली मोहल्ला, झामी चौक व घटनास्थळी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. अफरोज याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस स्टेशनला महेंद्र उर्फ डोकोमोविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
महेंद्र भोई बहादरवाडीला रेशनची गाडी खाली करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सिद्धांत शिसोदे, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, मंगल भोई, संजय सोनवणे, गणेश पाटील तेथे पोचले. पोलिसांची चाहूल लागताच महेंद्र बोरी नदीत पळाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. हिंगोणे गावाजवळील सीताराम महाराज मंदिराजवळ महेंद्रवर झडप घालून त्याला अटक केली. संशयिताला अटक केल्याने जमाव शांत झाला. शहरात संवेदनशील भागात कडक बंदोबस्त असून, पोलिसांनी व दोन्ही समाजाने शांततेचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.