जळगाव : शाहुनगरातून अटक करण्यात आलेल्या इम्रान भिस्ती उर्फ इम्मा आणि त्याचा साथीदार गोकुळ ऊर्फ रघु विश्वनाथ उमप या दोघांची पोलिस कोठडी मंगळवारी (ता. २६) संपली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. शाहुनगरात इतरही ड्रग्ज विक्रेते असून, ते अद्याप फरार आहेत.
अटकेतील दोघांनी तांबापुरातील एका साथीदाराच्या नावाची कबुली दिली आहे. मुंबई येथून ड्रग्ज मागवले जात असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. दोघांना दोन दिवस अतिरिक्त पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Jalgaon Crime Shahunagar drug smuggling links to Mumbai news)
संपूर्ण जळगाव शहराला ड्रग्जच्या नशेत लोटण्याची तयारी शहरातील शाहुनगरातील ड्रग्ज माफियांनी केली आहे. ज्याच्याकडे वर्षभरापूर्वी दहा रुपये गुटख्याची पुडी घेण्यासाठी नव्हते त्या दंगलीतील गुन्हेगाराकडे चक्क १० लाखांचे ड्रग्ज सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शाहूनगर मुख्य केंद्र
गेल्या दोन वर्षांपासून शाहूनगर भागात मोठ्या प्रमाणावर ड्रग्सची विक्री होत आहे. इम्रान ऊर्फ इम्मा हुसेन भिस्ती (वय २५, रा. पत्री मशिदीजवळ, शाहुनगर) याला २२ मार्चला मध्यरात्री अटक करण्यात आली. त्याच्या माहितीवरुन पोलिसांनी त्यास माल पुरवणारा अट्टल ड्रग्ज पेडलर गोकुळ ऊर्फ रघु विश्वनाथ उमप (वय ४०, रा. कंजरवाडा) याला दिवस उजाडताच २२ मार्चला पोलिसांनी अटक केली.
दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर दोघांना न्या. बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपासात प्रगती आणि गुन्ह्याचे गांभीर्य पाहता न्यायालयाने दोघा संशयितांना दोन दिवस (ता. २८ मार्चपर्यंत) वाढीव पोलिस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी कामकाज पाहिले. (latest marathi news)
तांबापुरातील एकाचे नाव समोर
अटकेतील इम्रान ऊर्फ इम्मा भिस्ती आणि त्याचा साथीदार गोकुळ उमप या दोघांना तांबापुरा येथील साहिल हा डिलर माल पुरवत असल्याची माहिती समोर आली असून, त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. शाहुनगरात इम्माप्रमाणेच इतरही ड्रग्स पेडलर सक्रिय असून, मोठे रॅकेट येथे कार्यरत आहे. मुंबई येथून ही मंडळी रेल्वेने ड्रग्ज आणून त्याची विक्री करीत असल्याचे उघडकीस आले आहे.
त्याद्रुष्टीने तपास करावयाचा असल्याने पोलिसांनी वाढीव कोठडी मागितली होती. त्याचप्रमाणे अटकेतील संशयित गोकुळ उमप याच्याविरुद्ध नाशिकच्या आडगाव पोलिस ठाण्यात ड्रग्ज तस्करीचा गुन्हा यापूर्वी दाखल आहे. तर इम्मा ऊर्फ इम्रान भिस्ती याच्याविरुद्ध दंगलीसह हाणामारीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.