Jalgaon Crime News : शनिपेठचा कलेक्टरसह 2 पोलिस निलंबीत; पैशांसाठी वाळू वाहतूकदारास मारहाण

Jalgaon Crime : बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्यावर पैसे देण्यास नकार दिल्याने दोन पोलिसांनी वाळू वाहतुकदारास बेदम मारहाण करून बोट फ्रॅक्चर केले होते.
Crime
Crime esakal
Updated on

Jalgaon Crime News : बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्यावर पैसे देण्यास नकार दिल्याने दोन पोलिसांनी वाळू वाहतुकदारास बेदम मारहाण करून बोट फ्रॅक्चर केले होते. या घटनेत डीवायएसपी कार्यालयातील सचिन साळुंखे व शनिपेठ पोलिस ठाण्यातील राहुल पाटील यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून. (Jalgaon Crime shanipet Collector and 2 Police Suspended)

दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत. रविवारी (ता. १७) रात्री साडेबाराच्या सुमारा बिलवाडी फाटा ते वावडदा गावादरम्यान पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीसारखीच दिसणारी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोघी पोलिसांनी वाळू व्यवसायिक राकेश पाटील यांचे ट्रॅक्टर अडवून पैशांची मागणी केली.

आताच पैसे आणून दे, असा हट्ट धरल्याने बाचाबाची होवून वाद उफाळला. दोघी पोलिसांनी सरकारी दांडक्याने राकेश पाटील यांना अंगावर वळ उमटतील, अशा पद्धतीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा बोट फ्रॅक्चर झाला असून, त्याने तक्रार देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांतील कलेक्टर टोळीने ही तक्रार होऊ दिली नाही.

मात्र, घटनेची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यापर्यंत पोहोचली. चौकशी अंती प्रकरणात सत्यता आढळून आल्याने सोमवारी (ता. २२) डॉ. रेड्डी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी राहुल पाटील व डीवायएसपी कार्यालयातील सचिन साळुंखे यांच्या निलंबनाचे आदेश पारित केले.

Crime
Jalgaon District Collector : काळ्या यादीतील कंत्राटदार, शिक्षा झालेल्यांचे अर्ज होणार बाद : जिल्हाधिकारी प्रसाद

डीवायएसपींच्या वाहनाची कॉपी

रात्री वाळू व्यवसायिक आणि अवैध धंदेवाइकांकडून पैसे उकळण्यासाठी दोन्ही पोलिस वापरत असलेली कार पोलिस उपअधीक्षक यांच्या सरकारी वाहनाप्रमाणेच दिसणारी असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यांच्याच कार्यालयातील सचिन साळुंखे त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून खंडण्या गोळा करीत असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या वाहनावर ‘पोलिस’ असे लिहिले आहे.

आयजींपर्यंत तक्रारी

पोलिसांकडून खंडणीसाठी मारहाण झाल्याप्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्यापर्यंत तक्रार गेली होती. भाजपच्या एका मोठ्या मंत्र्यांकडे या पोलिस कर्मचाऱ्यांचा नातेवाईक पदाधिकारी असल्याने त्याच्याकडूनही कारवाई होऊ नये, यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असल्याची चर्चा पोलिस अधिकाऱ्यांमध्ये आहे.

"वाळू व्यावसायिक मारहाण प्रकरणातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, या प्रकरणाची अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्याकडे चौकशी सोपवण्यात आली आहे." - डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक

Crime
Nashik Crime News : बरॅको हॉटेलवर छापा! हुक्का पार्लर उदध्वस्त; अंमलीविरोधी पथकाची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.