Jalgaon Chain Snatching Crime : ‘चेन स्नॅचिंग’ करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक

Chain Snatching Crime : छत्रपती संभाजीनगर येथे व जळगावातही महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करणाऱ्या अट्टल चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
Prashant Sable
Prashant Sableesakal
Updated on

जळगाव : छत्रपती संभाजीनगर येथे व जळगावातही महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करणाऱ्या अट्टल चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यांच्या तपासासाठी त्यास छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षिका सुनीता भीमराव नेमाने या शास्त्रीनगर येथून रोडने पायी जात असताना सकाळी त्यांच्या पाठीमागून टीव्हीएस दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींपैकी दुचाकीच्या मागील सीटर बसलेल्याने त्यांच्या मानेला झटका देत १८ ग्रॅम सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून पळून गेले होते. (staunch thief who did chain snatching was arrested )

या प्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाणे, छत्रपती संभाजी नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी प्रशांत उर्फ बाप्या पंडितराव साबळे (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याने केल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्यानुसार सुप्रीम कॉलनी येथून सहाय्यक फौजदार संजय हिवरकर, रवींद्र नरवाडे, अतुल वंजारी, पोलिस हवालदार विजय पाटील, राजू मेढे, हरिलाल पाटील यांनी त्याच सुप्रीम कॉलनी येथून ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले होते.

Prashant Sable
Nashik Crime News : उपनगरला भाजीपाला घेऊन घरी जाणाऱ्या महिलेची पोत खेचली

म्हणून त्यास पुढील कारवाईकामी स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजी नगर यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याने अजून दोन चेन स्नॅचिंग छत्रपती संभाजीनगर येथे केल्याबाबत कबुली दिली होती. अशा एकूण तीन चेन स्नॅचिंग उघडकीस आली आहे. प्रशांत साबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दुसरे साथीदाराचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Prashant Sable
Nashik Chain Snatching Crime : सोनसाखळी चोरट्यांना सात वर्षांचा सश्रम कारावास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.