बोदवड : येथील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसांत चोरीच्या १७ लाख रुपये किमतीच्या एकूण ३४ दुचाकी आरोपींच्या ताब्यातून जप्त केल्या. या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी (ता.१५) स्वतः बोदवड पोलिस ठाण्यात येऊन यशस्वी कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बक्षीसे देऊन गौरव केला. यापुढेही अशीच कामगिरी करून चोरीच्या घटनांना आळा घालावा, असे आवाहन करीत कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. (Jalgaon Crime Stolen two wheelers worth 17 lakhs seized)
बोदवड शहरातील नयनतारा भागातील फिर्यादी विजय पांडुरंग माळी यांची १९ जून २०२४ ला दुचाकी चोरीला गेली. याबाबत दाखल गुन्ह्याचा तपास सुरू होता. त्यात गुप्त माहितीवरून आरोपी जितेंद्र ऊर्फ दगडू नारायण सोनवणे (वय ३१, रा. वरणगाव हल्ली, मुक्काम न्यू. हुडको कॉलनी, भुसावळ) याला भुसावळमधून मोठ्या शिताफीने अटक करून बोदवड पोलिसांनी ताब्यात घेतले.
विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने त्याच्यासोबत असलेला सहआरोपी रूपेश ज्ञानेश्वर चौधरी (वय २६, रा. सिद्धेश्वरनगर, वरणगाव) याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सहआरोपी रूपेश चौधरीलाही अटक केली. दोघांना विश्वासात घेतले असता, त्यांनी बोदवड, मुक्ताईनगर, वरणगाव, नांदुरा, मलकापूरसह इतर परिसरातील दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. (latest marathi news)
त्यामुळे चोरीला गेलेल्या १७ लाखांच्या ३४ दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. आरोपींनी सर्व दुचाकी १५ ते २० हजार रुपयांत परस्पर विकल्या होत्या. बोदवड पोलिसांनी सर्व दुचाकी ताब्यात घेतल्या. पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सहायक निरीक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधाकर शेजोळे, हवालदार रवींद्र गुरचळ, शशिकांत शिंदे, शशिकांत महाले, भूषण सोनवणे यांचा बक्षीस देऊन सत्कार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.