Jalgaon Crime News : गांधलीपुऱ्यात मोटरसायकल अडवून तिघांना मारहाण; 5 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

Jalgaon Crime : मोटरसायकल अडवून पाचही जणांनी तिघांना लोखंडी सळई व लाकडी फळ्यानी मारहाण करून जखमी केले.
beating
beatingesakal
Updated on

Jalgaon Crime News : मोटरसायकल अडवून पाचही जणांनी तिघांना लोखंडी सळई व लाकडी फळ्यानी मारहाण करून जखमी केले. ही घटना काल शनिवारी (ता.१५) सायंकाळी पाच वाजता येथील गांधलीपुऱ्यात घडली. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षलसिंग नरेंद्रसिंग ठाकूर (रा. रेल्वेस्थानकाजवळ) हा आपला मित्र राजेश खरारे याला घेऊन मोबाईल दुरुस्तीसाठी धुळ्याला गेला होता. (Three people were beaten up after blocking motorcycle )

अमळनेरला आल्यावर त्यांचा मित्र दुर्गेश सोनवणे भेटला. पाऊस सुरू असल्याने त्याने दोघांना घरी सोडण्याची विनंती केली. म्हणून ट्रिपलसीट त्याला घेऊन गांधलीपुरा भागात त्याच्या घरी गेले. त्यावेळी गरीबनवाब चौकात सलमान खान रफा, आकीबअली सैय्यद, सोहिल शेख सोडेवाला, नवाज खाटीक, एजाज पठाण यांनी मोटरसायकल थांबवून राजेश खरारे व दुर्गेश सोनवणे यांना मागे ओढून खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी दुर्गेश तेथून पळून गेला.

राजेशला मारहाण करीत असताना हर्षल मोटरसायकल काढून पुढे जाऊ लागला. तेव्हा सलमान रफा याने हातातील विट व लोखंडी सळई मारून मोटरसायकलवरून खाली पाडले. तुम्ही मारहाण का करीत आहेत, असा जाब समोरच्याना विचारले असता, त्यांनी तुमचा मित्र राजेश खरारे हा जास्तच हिंदुत्व दाखवून जास्तच रील करतो, असे सांगत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत अश्लील शिवीगाळ केली.

beating
Jalgaon Crime News : राष्ट्रीय महामार्गावर चाकूचा धाक दाखवत लाखाची लूट! चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

सलमानच्या हातात लोखंडी सळई, आकीब याच्या हातात लाकडी फळी, सोहेल व नवाज यांच्या हातात लाकडी काठ्या व एजाज याच्या हातात लोखंडी सळई होती. हर्षलच्या तोंडावर व पायावर मारून जखमी केले. यावेळी राजेशची आई रजनी खरारे व बहीण लक्ष्मी खरारे भांडण आवरायला आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. या भांडणात हर्षलचे २० हजार रुपये पडून नुकसान झाले.

याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात पाचही आरोपींविरुद्ध रस्ता अडवणे, मारहाण, अश्लील शिवीगाळ व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विकास देवरे, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, गणेश पाटील यांनी रविवारी (ता.१६) पहाटे सर्व पाचही आरोपींना अटक केली. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.

beating
Jalgaon Crime News : असोद्यात पिस्तुलीच्या धाकावर लूट; सट्टापेढी चालकाला पिस्तूल लावून 70 हजारांना लुटले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.