Crime
Crimeesakal

Jalgaon Crime News : शहरात पुन्हा खुनाचा थरार! हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेल्या दोघांवर सशस्त्र हल्ला

Jalgaon Crime : शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील हॉटेल भानूमध्ये बुधवारी (ता. २२) रात्री अकराच्या सुमारास जेवणासाठी बसलेल्या दोघांवर पाच ते सहा सशस्त्र गुंडाच्या टोळक्याने हल्ला चढविला.
Published on

Jalgaon Crime News : शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील हॉटेल भानूमध्ये बुधवारी (ता. २२) रात्री अकराच्या सुमारास जेवणासाठी बसलेल्या दोघांवर पाच ते सहा सशस्त्र गुंडाच्या टोळक्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात किशोर सोनवणे (कोळी) याचा मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. हॉटेल भानूमध्ये किशोर सोनवणे (कोळी) व त्याचा मित्र अमोल सोनार ऊर्फ गणप्या जेवणासाठी बसले होते. (Crime thriller of murder again in city )

रात्री अकराच्या सुमारास रुपेश मनोहर सोनार याच्यासह चार ते पाच सशस्त्र तरुणांनी त्या दोघांवर हल्ला चढविला. यात किशोर सोनवणे याच्या पाठीवर, छातीत व पोटावर डोक्यावर गंभीर जखमा झाल्याने तो जागेवरच गतप्राण झाला, तर अमोल सोनार गंभीर जखमी झाला. घटनेचे वृत्त कळाल्यानंतर शनिपेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले.

Crime
Jalgaon Crime News : 30 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; धरणगावातील प्रकार

अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ज्ञ आदी लवाजमा रात्री साडेअकराच्या सुमारास घटनास्थळावर दाखल झाला. पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केला.

मारेकऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साडेअकराला ताब्यात घेतले असून, त्यांना शनिपेठ पोलिस ठाण्यात आणले होते. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, जळगाव जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णत: ढासळली असून, ठराविक दिवसांनंतर प्राणघात हल्ले, खून, दरोडा, अशा घटना घडत आहेत.

Crime
Jalgaon Crime News : शंभर फुटी रोडवर कोयता गँगचा धिंगाणा; एकाच्या डोक्यात कोयत्याने, तर दुसऱ्यावर गुप्तीने वार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.