Jalgaon Bribe Crime : ‘कलेक्टोरेट’मध्येही लाचखोरांचे बस्तान; 20 हजारांची लाच घेताना 2 लिपिकांना अटक

Jalgaon Bribe Crime : ‘कलेक्टोरेट’ अर्थात, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागात कार्यरत दोन लिपिकांना वीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.
suspects
suspectsesakal
Updated on

Jalgaon Bribe Crime : ‘कलेक्टोरेट’ अर्थात, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागात कार्यरत दोन लिपिकांना वीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. रायपूर ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सदस्याला तीन अपत्यांबाबत दाखल तक्रारीवर अनुकूल अहवाल सादर करण्यासाठी या महाभागांनी ३० हजारांची मागणी केली होती. चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत पडलेल्या छाप्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. (Jalgaon Crime Two clerks in District collector office were caught by anti corruption department while accepting bribe)

जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत तक्रारदार निवडून आले होते. परंतु त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तीन अपत्य असल्याबाबत ग्रामस्थांकडून तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत विभागात कार्यरत महेश रमेशराव वानखेडे, आणि समाधान लोटन पवार या दोघांनी तक्रारदाराला तीन अपत्यबाबत चौकशीसंदर्भात अनुकूल अहवाल तयार करून देण्यासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी शनिवारी (ता. ९) लाचलुचपत विभागात धाव घेतली. आलेल्या तक्रारीची खात्री झाल्यावर पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील.

suspects
Chhatrapati Sambhajinagar Crime : घराचे कुलुप तोडुन धाडसी चोरी; पारुंडी येथील घटना, एक लाखाचा ऐवज लंपास

पोलिस नाईक बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, अमोल वालझाडे, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला पोलिस शैला धनगर, किशोर महाजन.

सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर, राकेश दुसाने, प्रदीप पोळ यांनी नियोजनबद्ध सापळा रचला असता ग्रामपंचायत विभागात कार्यरत संशयित समाधान लोटन पवार यांनी ३० हजारांपैकी २० हजारांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांच्यावर झडप घातली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

suspects
Mumbai Crime: फसवणुकीच्या १० वर्षे जुन्या प्रकरणातील आरोपी अटकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.