Jalgaon Crime News : रस्तालूट गुन्ह्यात वापरलेली दुचाकी संशयिताकडून जप्त

Crime News : चोरीतील रोख रक्कम ही पोलिसांना काढून दिली होती तर या दोघांनी पोलिस कोठडीतील तपासात गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील यावल शहरातून काढून दिली. फैजपूर पोलिसांनी ती जप्त केली.
crime news
crime newsesakal
Updated on

यावल : फैजपूर रस्त्यावर हिंगोणा गावाजवळ सेल्समनचे वाहन अडवून त्यास मारहाण करीत दोघांनी ३९ हजार ७०० रूपयांची रोकड हिसकावली होती. या प्रकरणी अटकेत असलेल्या संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Two wheeler used in street looting crime seized from suspect)

यावल - फैजपूर रस्त्यावर २५ जुलैच्या रात्री चेतन गोपाल दरेकर हे सेल्समन वाहनाने (क्रमांक एमएच १९, सीएक्स ०३५०) यावलकडे येत असताना हिंगोणा गावाजवळ त्यांचे वाहन दुचाकीवर आलेल्या फरदिन कदीर पटेल व सोहेल रुबाब पटेल या दोघांनी अडवत आणि त्यांच्याजवळ असलेली ३९ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम घेऊन ते फरार झाले.

त्यांनी चोरीतील रोख रक्कम ही पोलिसांना काढून दिली होती तर या दोघांनी पोलिस कोठडीतील तपासात गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील यावल शहरातून काढून दिली. फैजपूर पोलिसांनी ती जप्त केली. (latest marathi news)

crime news
Pune Crime News : पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून तरुणावर कोयत्याने वार

दोघांना पोलिसांनी यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश आर. एस. जगताप यांच्यासमोर हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात केली आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास बोचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद तपास करीत आहेत.

crime news
Jalgaon Crime News : पट्टेदार वाघाची शिकार करून कातडीची तस्करी; नशिराबाद टोल नाक्यावर कातडीसह 6 संशयितांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.