Jalgaon Crime News : चुलत भावासह मित्रांकडून विवाहितेवर अत्याचार; अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेल

Crime News : अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षांपासून अत्याचार सुरू होता.
Crime Against Wome
Crime Against Womeesakal
Updated on

Jalgaon Crime News : अठ्ठावीस वर्षीय विवाहितेवर तिच्या चुलत भावासह त्याच्या दोन मित्रांनी अत्याचार केला. अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षांपासून अत्याचार सुरू होता. (Jalgaon Crime Wife assaulted by friends including cousin)

Crime Against Wome
Amravati Crime : हत्येचा गुन्हा बाभूळगाव पोलिसांना हस्तांतरित;पत्नीसह मित्राची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पीडिता तीन मुलांची आई आहे. दोन ते अडीच वर्षांपूर्वी लग्न असल्याने नातेवाईक एकत्र आले होते. नात्यातील एकाशी पीडितेची ओळख झाली. त्याने पीडिता अंघोळ करीत असताना, व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला. त्या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून तिच्याशी शारिरीक संबध प्रस्थापित केले. त्याच्या दोन मित्रांनाही पीडितेवर अत्याचार करून त्रास देणे सुरू केले.

त्रास नकोसा झाल्याने अखेर पीडितेने पती व कुटंबीयाच्या आधाराने हिंमत करून रविवारी (ता. २३) दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात पीडितेचा चुलत भाऊ सचिन किशोर भाट (रा. नंदुरबार), बंटी नेतलेकर (दोंडायचा), नीलेश तमायचेकर (नंदुरबार) यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, इन्स्टाग्रामवर पीडितेचे अकाउंट असल्याने त्याद्वारे संशयित सचिन भाट पीडितेशी संपर्कात होता. त्याच माध्यमातून त्याने ब्लॅकमेल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Crime Against Wome
Nagpur Crime : अपहरण करून फेकले विहिरीत;जुन्या भांडणातून काढला युवकाचा काटा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.