Jalgaon Crime News : बनावट नोटा प्रकरणी जिल्हापेठ पोलिस बऱ्हाणपूरला रवाना

Latest Crime News : मात्र, यातील म्होेरक्या मोकाट असून, त्याला पकडण्यासाठी जिल्‍हापेठ पोलिस मध्य प्रदेशात ठाण मांडून आहेत.
fake notes
fake notesesakal
Updated on

Jalgaon Crime News : बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आलेल्या यावल येथील संशयिताला जिल्‍हापेठ पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा १२ हजार ५०० रुपयांत गावातील फायनान्सचे काम करणारा नईम बदरुद्दीन शेख (वय ३८, रा. यावल) याच्याकडून घेतल्याने त्यालाही अटक झाली. मात्र, यातील म्होेरक्या मोकाट असून, त्याला पकडण्यासाठी जिल्‍हापेठ पोलिस मध्य प्रदेशात ठाण मांडून आहेत. (Zillapeth police left for Barhanpur in case of fake notes)

fake notes
Baba Siddique हत्या प्रकरणात मोठा खुलासा, Zeeshan Siddique यांनाही मारण्याचा प्लॅन? | Crime News

जिल्हापेठ पोलिसांनी चेतन शांताराम सावकारे (वय २७, रा. यावल) याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याच्याकडून ९७ हजार ५०० रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल जप्त केले होते. तपासात चेतनने बनावट नोटा नईम बदरुद्दीन शेख याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यावरून संशयित नईम शेखला यावल येथून ताब्यात घेतले.

या प्रकरणात दोघांना अटक केल्यानंतर संपूर्ण रॅकेट असून, त्याचे धागेदोरे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरपर्यंत पोहोचले होते. त्यानुसार दुसऱ्यांदा गुन्हे शोध पथक बऱ्हाणपूरला रवाना झाले असून, नोटा पुरविणाऱ्याचा ते शोध घेत आहेत. चेतनने बनावट पंधराशे रुपये चलनात आणले. मात्र, उर्वरित पैसे चलनात आणण्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

fake notes
Nashik Crime News : तोतया आयपीएसला पोलिसांनी केले गजाआड! घरातून वर्दीसह कागदपत्रे जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.