जळगाव : दोन महिलांसह वृद्धाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या दोन्ही ठेकेदारांविरुद्ध (झांडू व ॲग्रो इन्फ्रा) गुन्हा दाखल करण्याचा निर्णय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शहराबाहेरून जाणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण मार्च २०२५ पूर्ण करण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र संबंधित ठेकेदाराकडून घेण्याचा या वेळी निर्णय झाला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत सोनवणे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. (Criminal charges filed against both highway contractors)