Jalgaon Heavy Rain Crop Damage: पावसामुळे 515 हेक्टरवरील पिकांचे नुकसान! दोन दिवसांतील चित्र; सर्वाधिक नुकसान कापूस, केळीचे

Latest Rain Damage News : २४ व २५ सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान कापूस व केळी पिकाचे झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
Heavy Rain Crop Damage
Heavy Rain Crop Damageesakal
Updated on

Jalgaon Heavy Rain Crop Damage : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामुळे खरीप हंगाम हातचा जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. २४ व २५ सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान कापूस व केळी पिकाचे झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. (Crop damage on 515 hectares due to rain)

शहरासह जिल्ह्यात चार दिवसांत कोठेही, केव्हाही अचानक जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचून शहर जलमय होत आहे, तर शेतात अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबरमध्ये कापसाला फुले लागून कापूस बाहेर येण्याची वेळ असते. मात्र, अतिपावसामुळे फुले गळून पडू लागली आहेत. काही ठिकाणी कापसाची बोंडे काळी पडली आहेत, केळीचेही नुकसान झाले आहे.

पिकांचे झालेले नुकसान

बाधित गावे-- २५

बाधित शेतकरी-- ७५६

अधिक फटका- जळगाव व रावेरला

कापूस-- २९४

ज्वारी-- ६० हेक्टर

मका-- ५५.५२

तूर-- १२

फळबाग-- ६०

केळी-- ६२

एकूण ः ५१५ हेक्टर

(latest marathi news)

Heavy Rain Crop Damage
Nashik Heavy Rain Damage: नाशिककरांना परतीच्या पावसाने झोपडले! रस्ते पाण्यात; वाहतूक कोंडीचा मनस्ताप, जनजीवन प्रभावीत

अर्ध्या तासात जळगाव जलमय

जळगाव : शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टी होऊन जळगाव शहर जलमय झाल्याचे दिसून आले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. हवामान विभागाने जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टी व ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला होता.

शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुरुवातीस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अर्ध्या तासात शहरातील चित्रा चौक, टॉवर चौक, रेल्वेमार्ग परिसराकडे शिवाजीनगर, बजरंग पूल, तसेच शहर महापालिका प्रशासकीय कार्यालयाजवळील गोलाणी व्यापारी संकुल, खाऊ गल्ली आदी सखल भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याचे दिसून आले. यामुळे पादचारी नागरिकांना गुडघ्याच्यावर पाण्यातून वाट काढीत मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागले.

Heavy Rain Crop Damage
Nashik Heavy Rain Damage: परतीच्या पावसाचा 84 हेक्टरला तडाखा! कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज; मका, भात अन कांद्याचे सर्वाधिक नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.