जळगाव : कापड उद्योगात विश्वात ख्यातनाम ब्रॅण्ड असलेल्या रेमंड वस्त्रोद्योगाच्या जळगाव युनिटमध्ये शनिवार (ता. १०) रात्रीपासून कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.व्यवस्थापनातर्फे यंदा पगारवाढीवर करार नोटीस बजावली आहे.
ती यंदाच्या महागाईच्या तुलनेत अत्यल्प आणि गेल्या वर्षाइतकीच असल्याचा आरोप कामगारांनी केला असून, आधी करारावर स्वाक्षरी करावी नंतरच कामाला सुरवात करावी, असे व्यवस्थापनाने ठरविल्याने अचानक कामबंद आंदोलन पुकारण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. (Jalgaon Crowd of workers gathered at Raymond gate Jalgaon News)
जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात रेमंड वस्त्रोद्योग कंपनीच्या युनिटमध्ये शनिवारी नाइट शिफ्टपासून कामबंद झाले आहे. परिणामी, आतील कर्मचारी आतच राहिले, तर नव्या शिफ्टसाठी आलेले कामगार बाहेर गेटवरच थांबून कामगारांनी दुतर्फा आंदोलनास प्रारंभ केला आहे.
आंदोलक कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगारांशी चर्चा न करता व्यवस्थापन समितीने एका संघटनेशी संगनमत करून अचानक कामगारांना नववर्षाच्या वेतनवाढीचा करार ठरवून घेतला आहे आणि त्या करारावर स्वाक्षरी केल्याशिवाय काम करता येणार नाही, असा पवित्रा व्यवस्थापन समितीने घेतला असून, कामगारांनी याला विरोध करत कामबंद आंदोलन पुकारल्याचे सांगण्यात आले.
राजकारणाचा गंध
रेमंड वस्त्रोद्योग लिमिटेड कंपनीत कामगार उत्कर्ष सभा आणि खानदेश कामगार उत्कर्ष संघटना, अशा दोन कामगार संघटना कार्यरत असून, कामगार उत्कर्ष सभेची धुरा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे असून, नगरसेवक ललित कोल्हे खानदेश कामगार संघटनेवर आहेत. एक संघटना व्यवस्थापनाच्या बाजूने असून, दुसऱ्या संघटनेचा तीव्र विरोध असल्याने त्याच्या सदस्य कामगारांनी कामबंद ठेवल्याचेही सांगण्यात आले. रविवारी (ता. ११) दुपारी तीनशे ते साडेतीनशे कामगार गेटवर उपस्थित असून, कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अशी आहे कामगार संख्या
कायम कर्मचारी : १,२००
कंत्राटी कामगार : १,५००
व्यवस्थापनाचा बोलण्यास नकार
घडल्या प्रकाराबाबत व्यवस्थापनाची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, प्लांट हेड अलिम समस्थी यांनी बोलण्यास नकार दिल्याने व्यवस्थापनाची नेमकी बाजू समोर येऊ शकली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.