Jalgaon Cotton News : एचटीबीटी ची दरवर्षी चर्चा! खर्च वाचविण्यासाठी गुजरातहून आणले जाते वाण

Jalgaon Cotton : खानदेशात सध्या खरीप पूर्व (आगाप )कपाशीच्या लागवडीला सुरवात झालेली आहे.
Cotton Crop
Cotton Crop esakal
Updated on

Jalgaon Cotton News : खानदेशात सध्या खरीप पूर्व (आगाप )कपाशीच्या लागवडीला सुरवात झालेली आहे. दरवर्षी पर्यावरणाच्या कारणास्तव राज्यात एचटी बीटी (हरबीसाईड टॉलरंट) वाणांना लागवडीसाठी परवानगी नसते. मात्र हे बियाणे गुजरात मधून आणून शासन कितीही प्रयत्न करीत असले तरी दरवर्षी लागतेच हे निश्चित आहे. गुजरात मधून येणाऱ्या या कपाशीला तणनाशक मारून तणाचा नाश करता येत असल्याने शेतकरी या वानाकडे वळतात. (jalgaon Cultivation of pre Kharif cotton has started in Khandesh )

एचटीबीटी बाबत मतभिन्नता आहे. शासनाची याला परवानगी नसली तरी शेतकऱ्यांना निंदणीचा खर्च वाचत असल्याने या कपाशीची लागवड शेतकऱ्यांना सोयीची वाटते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मतावर ते सोडण्यात यावे असाही एक मतप्रवाह आहे. विशेष म्हणजे हे बियाणे एक पंधरवाडा अगोदर मिळत असल्याने शेतकरी ते महत प्रयत्नातून मिळवतात.

मग एक बॅग साठी कधी ८०० ते कधी पंधराशे रुपये खर्चही करतात. गेल्या दशकभराचा आढावा घेतल्यास हे वाण शेतकऱ्यांना कधी परवडले आहेत तर कधी नुकसानीत गेले आहेत . यातून एक मात्र नक्की की काळ्या जमिनीत अधिक पाऊस (झडी) हे वाण सहन करू शकत नाही. (latest marathi news)

Cotton Crop
Jalgaon Cotton Crop : अधिक कापूस उत्पादनामुळे 28 लाख गाठींची निर्मिती होणार

राज्यात यावर्षी पंधरा मे पासून कपाशीच्या बीटी वाणाला विक्रीस परवानगी मिळाली होती .मात्र ते आज उद्या उपलब्ध होत असल्याचे दिसून आले . त्यालाही कुठे लिंकिंग तर कुठे अधिक भाव आहे. खानदेशात बीजी दोनच्या विविध वाणांना मागणी असली तरी एचटीबीटी सह सरळ वाण लागवडीकडे काही शेतकऱ्यांचा ओढा असतो.

खानदेशात एकूण कपाशीची लागवड पाहता पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुमारे एक ते दीड लाख हेक्टर वर कपाशीची लागवड झालेली असते .खानदेशात दरवर्षी निदान सात ते आठ लाख हेक्टर वर कपाशीची लागवड होते एचटीबीटी बाबतीत नंदुरबार जिल्ह्यात गुजरात जवळ असल्याने त्या भागात या वानाची लागवड अधिक दिसते.

मात्र कोणताही शेतकरी पीक घेताना कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे येईल याकडे लक्ष देत असल्याने कदाचित एचटी बीटी बाबत शेतकऱ्यांमध्ये मागणी दिसून येते एकंदरीत पाहता २० मे नंतर खानदेशात कपाशी लागवडीला वेग येणार असून संकरित बीजी दोन चे विविध कंपन्यांचे वाण लागणार असून उशिरा येणाऱ्या (१६५ ते १७५ दिवस) वानांना मे महिन्यात लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो.त्यानंतर जून लागताना शेतकरी १३५ ते १५५ दिवस कालावधीचे वाण घेतात.

Cotton Crop
Jalgaon Cotton News : केवळ 15 लाख गाठींचे उत्पादन! आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी कमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.