Jalgaon Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावे 11 लाखांची फसवणूक

Latest Crime News : २८ जुलै ते २ ऑक्टोबरदरम्यान नारायण जिंदाल व चिन्मई रेड्डी अशी नावे सांगणाऱ्या दोघांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

Jalgaon Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून संजय राजाराम वसतकार (वय ४२, रा. एसएमआयटी कॉलेज) यांना ११ लाख ८२ हजार रुपयांत ऑनलाइन गंडविण्यात आले. २८ जुलै ते २ ऑक्टोबरदरम्यान नारायण जिंदाल व चिन्मई रेड्डी अशी नावे सांगणाऱ्या दोघांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (Fraud of 11 lakhs in favor of investment in stock market)

शहरातील एसएमआयटी कॉलेज परिसरातील संजय राजाराम वसतकार (वय ४२) यांच्याशी २८ जुलैला नारायण जिंदाल व चिन्मई रेड्डी यांनी संपर्क साधला. विश्वास संपादन करून त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ॲड करून त्यांना लिंक पाठविली. नंतर कोटक निओ नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यात पैसे गुंतविण्यास सांगितले.

त्यानुसार संजय वसतकार यांनी ॲप्लिकेशनमध्ये पैशांची गुंतवणूक केली. त्यांनी गुंतविलेल्या पैशांवर वसतकार यांना तब्बल दोन लाख ८२ हजार ५९९ रुपयांचा नफा झाल्याचे सांगितले. दरम्यान, संशयितांनी संजय वसतकार यांच्याकडून वेळोवेळी ११ लाख ३० हजार ४७ रुपये ऑनलाइन बँकिंगद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यात स्वीकारले. (latest marathi news)

Cyber Crime
Nashik Cyber Crime : सायबर भामट्यांनी 70 लाखांना गंडविले! दोन वेगवेगळ्या घटनांचे गुन्‍हे दाखल

काही दिवसांनंतर गुंतवणुकीवर झालेल्या नफ्याची रक्कम काढता येत नसल्याचे संजय वसतकार यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे कळताच तत्काळ त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून नारायण जिंदल व चिन्मई रेड्डी या दोघांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड तपास करीत आहेत.

Cyber Crime
Nandurbar Cyber Crime : तळोद्यातील शेतकऱ्याची ऑनलाइन फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांकडून आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.