Jalgaon Cyber Crime: ऑनलाइन लुटारू राजस्थानच्या भाऊ-बहिणी गजाआड

Crime News : रसायन खरेदी-विक्री व्यवहारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून जळगावच्या तरुणाला फसविणाऱ्या राजस्थान येथील बहिण-भावाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत
jailed
jailedesakal
Updated on

Jalgaon Cyber Crime : रसायन खरेदी-विक्री व्यवहारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून जळगावच्या तरुणाला फसविणाऱ्या राजस्थान येथील बहिण-भावाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चंदाकुमारी ऊर्फ तानिया सत्यनारायण शर्मा (वय ३०) भरत सत्यनारायण शर्मा, (वय २७, भिलवाडा) अशी भिलवाडा (राजस्थान) येथील संशयित बहिणभावाची नाव आहेत. (Jalgaon Cyber ​​Crime marathi news)

या दोघा संशयितांनी जळगाव शहरातील एका तरुणाला २७ डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान या कालावधीत फेसबुक खाते व व्हॉटसअॅप क्रमांकावरुन संशयितांनी संपर्क व मेसेज चॅटिंग करून रसायन खरेदी विक्रीत गुंतवणुकीचे आमिष दाखविले.

झटपट पैसा दुप्पट करण्याचा भरवसा देत, ५ लाख ६४ हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी सायबर ठाण्यात गुन्हा दाखल होता. जळगावच्या सायबर पोलिसांनी भिलवाडा(राजस्थान) येथून संशयित भाऊ-बहिणीच्या जोडीला अटक केली. (Latest Marathi News)

jailed
Jalgaon Crime Update: कायद्याच्या राज्यात सुव्यवस्थेचं आव्हान! जळगाव जिल्ह्यात पोलीस यंत्रणा जरब ठेवण्यात अपयशी

सायबर ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकातील उपनिरीक्षक दिगंबर थोरात, राजेश चौधरी,मिलिंद जाधव,गौरव पाटील,दीपक सोनवणे यांच्या पथकाने बॅक व मोबाईल कंपनीकडे पत्रव्यवहार करून आवश्यक माहिती घेत, संशयित चंदाकुमारी आणि भरत या दोघांना राजस्थान येथून उचलले.

पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जळगाव पोलिसांच्या पथकाने राजस्थानातील भिलवाडा येथे शास्त्रीनगर येथून अटक केली. अटकेतील दोघे भाऊ-बहिण असून त्यांच्या ताब्यातून ४८ वेगवेगळ्या बँकेचे चेकबुक, २० वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, वेगवेगळ्या कंपनीचे २ मोबाईल फोन, ५ सिमकार्ड असे पुरावा पोलिस पथकाने जप्त केला. दोघा संशयितांना न्यायालयाने ५ दिवसांच्या कोठडी दिली आहे.

jailed
Jalgaon Crime : श्रीराम समर्थ ‘ॲग्रो’एजन्सीचा परवाना निलंबित! कृषी विभागाची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.