पहूर (ता. जामनेर) : ‘नभातल्या वरुणा, येऊ दे करुणा, कणसांवरच अंकुरला, मक्याचा दाणा...’ या काव्यपंक्तींमधून व्यक्त होणारी बळीराजाची करूण कहाणी डोळ्यांत पाणी आणणारी ठरत आहे. अशीच परिस्थिती सध्या या भागात सर्वत्र दिसून येत आहे.
परतीच्या पावसाने पिके उद्ध्वस्त झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावरच शेतकऱ्यांचे दिवाळे निघाल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढे कसे होईल? या चिंतेने शेतकरी व्यथित झाले आहेत. झालेल्या नुकसानाची तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. (Damage from return rains in area)