Jalgaon Road Damage : महामार्गावरील साइडपट्ट्या ठरताहेत जीवघेण्या! खोटेनगर ते गिरणा पुलापर्यंतच्या रस्त्यावर अधिक अपघात

Jalgaon News : अनेक महिन्यांपासून महामार्गाच्या दोन्ही साईडच्या साईडपट्ट्या खोल गेल्या आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
Potholes and damaged sidings along the highway from Khotenagar to Girna bridge.
Potholes and damaged sidings along the highway from Khotenagar to Girna bridge.esakal
Updated on

Jalgaon Road Damage : जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत तब्बल १८७ जणांचा मृत्यू अपघातात झाला आहे. त्यातील सुमारे अनेक मृत्यू राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने नसलेल्या साईडपट्ट्यांमुळे झाले आहेत. अनेक महिन्यांपासून महामार्गाच्या दोन्ही साईडच्या साईडपट्ट्या खोल गेल्या आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. (Jalgaon damaged roads side rails on highway become fatal)

शहरातील खोटेनगर ते गिरणा नदी पुलापर्यंच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या खोल गेल्या आहेत. यामुळे दुचाकीचालकांना महामार्गावर चढताना अपघात होत आहे. मोठे वाहने ओव्हरटेक करताना दुचाकीस्वाराला साईडपट्टीवर यावे लागते.

मात्र, त्या खोल असल्याने दुचाकीचालकांचा तोल जाऊन ते खाली पडतात. त्यांच्या मागून इतरही दुचाकी असल्याने त्यांनाही अचानक वाहन पुढे आल्याने नियंत्रण करता येत नाही. यामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. साईडपट्ट्यांवर कडक मुरुम टाकून त्या मजबूत कराव्यात, अशी मागणी होत आहे. (latest marathi news)

Potholes and damaged sidings along the highway from Khotenagar to Girna bridge.
Maharashtra News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

बैठका केवळ कागदावरच

जिल्हा अपघात नियत्रंण समितीच्या केवळ बैठका होतात. त्या बैठकीत झालेल्या निर्णयावर लागलीच कार्यवाही कोणीही करीत नाही. अपघातावर नियंत्रण करण्यासाठी रस्ते चांगले आहेत किंवा नाही, हे जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग, आर.टी.ओ. यांची एकत्रित आहे. मात्र, बैठका केवळ कागदावर होतात. प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. सर्वसामान्य माणूस रस्त्यावर अपघातात जीव गमाविता अन्‌ रस्ते तयार करणारे व त्यावर नियंत्रण ठेवणारे केवळ ‘मलिदा खातात’.

जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करावी

खोटेनगर ते गिरणा नदीवरील पूल, बांभोरी ते पाळधीपर्यंतच्या महामार्गाची व साईडपट्ट्यांच्या दुरवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. मात्र, तेही पाहणी करतील का? की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवतील, असा प्रश्‍न आहे.

Potholes and damaged sidings along the highway from Khotenagar to Girna bridge.
Jalgaon Agriculture News : 1200 एकरावर उभारल्या कांद्याच्या रोपवाटिका! खानदेशातील शेतकऱ्यांकडून लागवडीसाठी जोरदार तयारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.