Jalgaon News : रशियातील अमळनेरच्या विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले

Jalgaon : रशिया येथे ‘एमबीबीएस’च्या शिक्षणासाठी गेलेल्या अमळनेर येथील जिशान व जिया यांचे मृतदेह शनिवारी (ता. ८)) सकाळी सापडली आहेत.
dead body
dead body sakal
Updated on

Jalgaon News : रशिया येथे ‘एमबीबीएस’च्या शिक्षणासाठी गेलेल्या अमळनेर येथील जिशान व जिया यांचे मृतदेह शनिवारी (ता. ८)) सकाळी सापडली आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत ही मृतदेह भारतात आणली जातील, अशी माहिती राजदूत कुमार गौरव यांनी दिल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला या घटनेचे गांभीर्य ओळखून राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याकडूनही मंत्रालयस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ()

''निवडून आल्यानंतर नवी दिल्लीला आल्यावर अमळनेर येथील जिशान व जिया, भडगावचा हर्षल रशियात वोल्कोव्ह नदीत वाहून गेल्याची दुर्दैवी बातमी कळाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी बोलणे झाल्यावर राजदूत कुमार गौरव यांच्याशी संपर्कात होते. शनिवारी सकाळी त्या दोघांचे शव आढळून आल्याचे कुमार गौरव यांनी सांगितले. मात्र, शवविच्छेदन व त्यांनतर शव ताब्यात देण्यासाठी व भारतात पाठविण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. यासाठी दोन ते तीन दिवस लागणार आहेत. त्यामुळे मंगळवार ते गुरुवारपर्यंत मृतदेह अमळनेरात येण्याची शक्यता आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शासकीय पातळीवर जी काही मदत लागेल, त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. राजदूत कुमार गौरव व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संपर्कात आहे.''- स्मिता वाघ, खासदार, जळगाव

dead body
Jalgaon News : अमळनेरातील 2 विद्यार्थ्यांचा रशियात पाण्यात बुडून मृत्यू; MBBSच्या शिक्षणासाठी दोघे होते रशियात

‘त्या’ दोघींचे शव मंगळवारपर्यंत आणण्याचे प्रयत्न : मंत्री अनिल पाटील

रशियाच्या नदीत वाहून गेलेल्या अमळनेर येथील जिशान आणि जिया या दोन्ही विद्यार्थ्यांचे शव सर्व प्रक्रिया पूर्ण करून दुबईमार्गे विमानाने मंगळवारपर्यंत अमळनेरात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमळनेर येथे पिंजारी कुटुंबीयांची भेट घेतली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या माध्यमातून चार दिवसांपासून भारतीय राजदूतांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. प्रामुख्याने नागरी उड्डाणमंत्री राहिलेले प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्याचे चीफ सेक्रेटरी यांची चांगली मदत झाली.

मृतदेह हाती लागल्यावर विच्छेदन झाले असून, न्यायालयाच्या परवानगीनंतर दोघांचे मृतदेह प्रफुल्ल पटेल यांच्याच मदतीने कार्गोच्या सहय्याने भारतीय राजदूतच्या माध्यमातून मृतदेह जास्तीत जास्त मंगळवारपर्यंत भारतात तथा मुंबईपर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पिंजारी कुटुंबीय आपले निकटवर्तीय असून, घटनेचे वृत्त कळताच शासकीय पातळीवर मी प्रयत्न सुरू केला होता. घटनेपासूनच जिल्हाधिकारी, मुख्य सचिव, प्रफुल्ल पटेल यांच्या समवेत चांगले समन्वय असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले.

dead body
Jalgaon News : आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलासाठी 240 कोटींना तांत्रिक मंजुरी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.